शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली काळ्या गव्हाची लागवड

औरंगाबाद – गहू म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर लाल तांबूस आकाराचे धान्य डोळ्यासमोर दिसते पण मी म्हटलं, आहो… गहू काळा पण असतो बरं तर क्षणभर तुमचा  विश्वास बसणार नाही…

औरंगाबाद जिल्ह्यात ल एका शेतकऱ्याने शेतीत मोठा बद्दल घडवून आणला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या एका शेतकऱ्याने चक्क काळ्या गव्हाची लागवड (Cultivation of black wheat) केली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या कृष्णा फलके या तरुण शेतकऱ्याने या काळ्या गव्हाची लागवड केली आहे.

कृष्णा फलके यांनी लागवड केलेल्या काळ्या गव्हाला बघण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहे तर आजूबाजूच्या कृष्णा फलके यांनी केलेल्या लागवडीची आजूबाजूच्या  परिसरातील शेतकरी  यांच्या वावरात हजेरी लावताना दिसत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शेतकरी शेतात अनेक बद्दल घडून आणतात तर मागील काही दिवसांपूर्वी या गावातील समाधान फलके या  शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड करून दाखवली होती आणि  तर आता फुलंब्री तालुक्यातील कृष्णा फलके या शेतकऱ्याने देखील काळ्या गव्हाची लागवड (Cultivation of black wheat)  करून परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन पायंडा घालून दिला आहे.

काळा गहु विकसित होण्यासाठी पाच महिन्याचा कालावधी लागतो. साधारण गहू तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जातो मात्र काळा 2 तब्बल 6 हजार 500 रुपये क्विंटल प्रमाणे विकला जातो. म्हणजे काळ्या गव्हाला साध्या गव्हापेक्षा दुपटीने भाव प्राप्त होत असतो. कृष्णा यांनी लागवड केलेल्या काळया गव्हाला तीन महिने उलटून गेले आहेत आणि येत्या दोन महिन्यात गहू काढणीसाठी तयार होणार आहे. कृष्णा यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक त्यांच्या वावरात हजेरी लावत आहेत.

काळ्या गव्हाच्या वाणाची निर्मिती :-

नॅशनल ॲग्री फूड बायॉटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, मोहाली, पंजाब येथील प्रयोग शाळेत डॉ. मोनिका गर्ग यांनी काळ्या गव्हाच्या वाणावर संशोधन केले. या काळ्या गव्हात कोणते घटक आहेत, तर यात झिन्क, मॅग्नेशियम, लोह, याचे प्रमाण सामान्य गव्हापेक्षा अधिक असल्यामुळे तसेच ॲथोसायनिन या घटकाचे प्रमाण या गव्हामध्ये 100 ते 200 पीपीएम आहे. त्यामुळे शरीराची होणारी झिज लवकर भरून निघते. या गव्हात शर्करेचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे मधुमेहासारख्या आजरासाठी फायदाच होईल, तसेच काळ्या गव्हाला पाणी कमी लागते, तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला नाही आणि फुटव्याची संख्या अधिक असल्यामुळे बियाणे कमी लागते.