घरगुती कामगार महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी बचतगट तयार करा – बच्चू कडू

अकोला घरगुती कामगार महिला (Women) यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कामगार कल्याण विभाग तसेच सामाजिक- स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून  बचतगट तयार करावे. त्यामाध्यमातून त्यांच्या संघटनातून त्यांच्या विकास व आरोग्यासाठी विविध योजना राबवाव्यात असे निर्देश राज्याचे कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी येथे दिले. अशा प्रकारची योजना राज्यात प्रथम अकोला जिल्ह्यात राबविली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

घरगुती कामगार महिला तसेच त्यांचे मालक यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन भवनात करण्यात आले होते. याबैठकीस सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाणे, सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माविमंच्या समन्वयक वर्षा खोब्रागडे तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीस मोठ्या प्रमाणावर घरगुती कामगार महिला तसेच मालक व सामाजिक सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की,  या महिलांचे बचत गट तयार करुन त्यांना बॅंकखाते उघडून विविध कर्ज योजनांचा लाभ देता येईल.  यासोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करता येईल. याशिवाय त्यांच्या कुटुंबात व्यसनी व्यक्ती असेल तर त्यांच्या व्यसनमुक्तीसाठीही प्रयत्न करता येतील. त्यांना चप्पल, हातमोजे, कामाच्या ठिकाणी वापरावयाचे सुरक्षित कपडे यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही केले.

महत्वाच्या बातम्या –