शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकरिता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसित करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टल मध्ये करावा.
कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले. विभागाच्या वतीने पोर्टलबाबत सादरीकरण यावेळी कृषीमंत्र्यांना करण्यात आले. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा या पोर्टलमध्ये समावेश करता येईल याबद्दलही विचार करावा, अशी सूचना डॉ. बोंडे यांनी केली.
या पोर्टलमध्ये सध्या 11 योजनांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फळबाग योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, बिरसा मुंडा कृषी स्वावलंबी योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना, दुष्काळी क्षेत्र विकास, राष्ट्रीय अन्नसुरक्षा, अन्नधान्य, तेलबिया, उस, कापूस, राष्ट्रीय कृषी विकास योजना(वयक्तीक लाभार्थी). या पोर्टलवर सर्वप्रथम शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम
करंजवण धरण ते मनमाड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता