या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले तसेच हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले. १८ जूनपर्यंत झालेला मॉन्सून हा सरासरीपेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आहे. यापुढील किमती बहुतांश मॉन्सूनच्या प्रगतीवर अवलंबून आहेत.
पेरण्या उशिरा होत असल्यामुळे उत्पादनाचे अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे भाव वाढले आहेत. रब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत. हरभऱ्याचा शासनाकडील साठा कधीही बाजारात येईल अशी अपेक्षा असल्याने त्याचे भाव नरम आहेत. या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले. हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले.
पुढील काही महिन्यांत सोयाबीन व कापूस वगळता इतर सर्व पिकांचे भाव वाढतील, पुढील वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव जूनअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे.
गेल्या सप्ताहामधील किमतीतील चढ-उतार
मका (रब्बी)
रब्बी मक्याच्या (जुलै २०१९) किमती मे महिन्यात २३ तारखेपर्यंत वाढत रु. १,९९४ पर्यंत गेल्या. नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ७.८ टक्क्यांनी वाढून रु. १,९५२ वर आल्या आहेत.
सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (जुलै २०१९) किमती १५ मेपर्यंत वाढत रु. ३,८२५ पर्यंत गेल्या. नंतर त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या रु. ३,६४२ वर आल्या आहेत.
कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जुलै २०१९) किमती १३ मेपर्यंत घसरत होत्या. नंतर त्या वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी घसरून रु. २१,३२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी वाढून रु. २१,९६० वर आल्या आहेत.
गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जुलै २०१९) किमती मे महिन्यात घसरत होत्या (रु. ४,५६८ ते रु. ४,३३०). गेल्या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,२१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. ४,२७३ वर आल्या आहेत.
आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांचं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र
जाणून घ्या नारळ जाती, लागवडीबाबत माहिती….