केळाच्या सालीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

केळ हे साधारणतः सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे……

  • केळीच्या सालीचे सेवन केल्याने शरीरावरील चरबी कमी करता येते.
  • ऑस्ट्रेलियातील आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार केळीच्या सालीचे सेवन केल्याने विटामिन बी6 शरीरास मिळते.
  • केळीच्या सालीचे रोज एकदा सेवन केल्याने महिन्याभरात सुमारे २ ते ३ किलो इतके वजन घटण्यास मदत होते. आणि तेही कोणतेही कष्ट न घेता.
  • सॉल्युबल आणि इनसॉल्युबल असे दोन प्रकारचे फायबर केळीच्या सालीमध्ये आढळते. ज्याचा शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
  • त्याचबरोबर केळीची साल हळुवार चेहेऱ्यावर चोळल्यास चेहेऱ्यावरील मुरुमं व पुटकुळ्या नाहीश्या होण्यास मदत होते.
  • केळीच्या सालीने चेहेऱ्यावर हळुवार मसाज केल्याने चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –