सहज उपलब्ध होणाऱ्या गुणकारी लवंग खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

पुणे- जगावर सध्या कोरोनाचेसावट आहे. यातच आता पावसाळा देखील सुरु होणार आहे. या काळात तब्ब्येतीकडे दुर्लक्षकरणे चांगलंच महागात पडू शकते म्हणूनच आम्ही आमच्या वाचकांसाठी काही आरोग्य वर्धनकरणाऱ्या काही टिप्स देत आहोत. विविध औषधी वनस्पती,पदार्थ याबद्दल आम्ही नेहमीचआपल्यासमोर उपयुक्त अशी माहिती आणत असतो.

आज आपण अशाच एका आयुर्वेदिक गोष्टीचीमाहिती जाणून घेणार आहोत, जी की बऱ्याच रोगांना,आजारांना दूर करण्याचीक्षमता ठेवते. आज आपण माहिती घेणार आहोत लवंग विषयी. तसे बघायला गेलं तर लवंग एकप्रकारचा मसाला आहे, परंतु आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग बऱ्याच रोगांना दूरठेवण्यासाठी केला जातो.

आजकाल टुथपेस्टमध्ये लवंग हा प्रमुख घटकअसतो. याचे कारण म्हणजे दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात खूपदुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी नक्की कमी होईल.बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला हे आजारनियमित होऊन जातात. पण लवंग तुम्हाला काही प्रमाणात दिलासा देऊ शकते.

सर्दी-ताप किंवा घसा बसला असेल तर तोंडात फक्त एक लवंग ठेवा. यामुळे तुम्हाला सर्दी-तापयापासून दिलासा तर मिळेलच, पण तुमचा आवाजही नीट होईल.बहुतेक लोकांना तोंडाच्या दुर्गंधाचीसमस्या असते. अशा लोकांसाठी लवंग अतिशय फायदेशीर आहेत. 40 ते 45 दिवसांपर्यंतदररोज सकाळी तोंडात संपूर्ण लवंगा खाल्ल्याने ही समस्या सुटू शकते.

महत्वाच्या बातम्या –