तुम्हाला माहित आहे का २ ते ३ हजार लिटर दूध देणाऱ्या म्हशी कुठल्या आहेत, तर मग घ्या जाणून…..

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो.

फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी दुधाळ म्हशींची निवड करावी. दुधाळ म्हशींची खास वैशिष्टये असतात. त्याचप्रमाणे म्हशी निवडाव्यात. दुग्ध्व्याव्सायाच्या दृष्टीने एका वितात म्हशीने २५०० लिटर दुध दिलं तर दुग्ध व्यवसाय फायदेशीर होतो. दुग्धव्यवसायासाठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या विटाच्या म्हशी निवडाव्या. त्यांचं वय ३ ते ४ वर्षाच असावं. त्या वर्षाला एक वेत देणाऱ्या असाव्यात व निरोगी असाव्यात. चला तर मग आपण जाणून घेऊयात की दुग्धव्यवसायासाठी कुठल्या जातींच्या म्हशी आपल्याला फायदेशीर असतात….

२४ ते ४८ तासांत विदर्भातील दक्षिणेकडील भागात हलक्या पावसाची शक्यता

म्हशींच्या जाती – 

सुरत – सुरत या जातीच्या म्हशीचा शरीर बांधा हा मध्यम असतो. या म्हशीचे शिंगे ही रुंद असतात तसेच  एका वेतात या म्हशी १८०० लिटर दूध देत असतात.

मेहसाणा – मेहसाणा ही म्हशीची जात सुरती आणि मुऱ्हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली आहे. तसेच या जातीच्या म्हशीची शरीर बांधणी ही मुऱ्हा जातीच्या म्हशीसारखी असते. या मेहसाणा जातीची म्हशी एका वेतात सरासरी ३ हजार लिटरपर्यंत दूध देतात.

भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही – राजू शेट्टी

पंढरपुरी – या म्हशी आकाराने मध्यम; पण अतिशय काटक असतात. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यांत गाभण राहतात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताचे वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. या म्हशी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध देते.

पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यात परिवहन विभाग घेणार पुढाकार – परिवहनमंत्री

मुऱ्हा – या म्हशींची शरीरबांधणी मोठी, भारदस्त व कणखर असते. तसेच या जातीच्या म्हशी एका वेतात १८०० ते २००० लिटर दूध देत असतात. ह्या जातीच्या म्हशी महाराष्ट्रासह उत्तर भारतातही आढळतात.

महत्वाच्या बातम्या –

दुधातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर – सुनिल केदार

शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात