नाशिक – सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असून पंचनामे करताना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस कृषी मंत्री दादाजी भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नरेंद्र दराडे, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, नितीन पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे पंचनामे हे बिनचूक करण्यात येवून केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळण्यासाठी मदत होईल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – सुभाष देसाई
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- ‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!