Share

दररोज रात्री झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं

केळं खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहित आहेत. केळ्यात पोषक तत्व सर्वाधिक प्रमाणात असतं यामुळे याचं सेवन केल्यावर अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार, केळं खाल्याने शरिरात ऊर्जा आणि शक्ती निर्माण होते.

उकळलेलं केळं (Boiled banana) खाल्यमुळे तुम्हाला तुमच्या शरिरात खूप लवकरच वेगळा बदल पाहायला मिळेल. रात्री झोपण्याअगोदर उकळलेलं सोनं खाल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. औषधीय असलेलं केळं अतिशय फायदेशीर असतं. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा चांगली झोप लागत नसेल तर याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. कारण केळ्याचं सेवन केल्यावर ही समस्या दूर होईल. झोप येत नसल्यास सालीसह केळ्याची चहा बनवून प्यायलास याचा फायदा होईल. एक आठवडा असं केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसेच सकाळी स्वतःला रोजच्यापेक्षा अधिक फ्रेश अनुभवाल.

झोपेची समस्या सतावत असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून पाहा. लहान आकाराचे केळं, दालचिनीचा तुकडा आणि एक कप पाणी घ्या. एका भांड्यात पाणी आणि दालचिनी घेऊन उकळा. पाणी चांगल उकळल्यानंतर केळ्याचे (Boiled banana) छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाका. हे मिश्रण 10 मिनिटे कमी आचेवर शिजवा. यानंतर हे सर्व मिश्रण चहा प्रमाणे घ्या.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon