परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल

पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गाजराची ४०० क्विंटल आवक होती. गाजराला प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक असताना, प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला … Read more

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर

अनेक वर्षांच्या खंडानंतर यंदा गव्हाच्या पेरणीक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सर्वसाधारण ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्र असताना ३२ हजार २०८ हेक्टरवरपेरणी झाली आहे. जिल्ह्यात मंगळवार  पर्यंत २ लाख ४७ हजार ५९६ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. उशीरा येणारे तूर पीक मातीमोल ! शेतकऱ्यांचे … Read more

नांदेड, परभणी, हिंगोलीत हमीभावाने ४५०० क्विंटल मूग खरेदी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ९५६ शेतकऱ्यांकडून ४ हजार ५९३ क्विंटल मूग खरेदी किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या तीन जिल्ह्यांतील ४५९ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख ९९ हजार २४० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अजून एकूण ४९७ शेतकऱ्यांचे २ कोटी ११ लाख ८१ हजार ४१० रुपये रकमेचे चुकारे येणेबाकी … Read more

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार

अवेळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील वेचणीस आलेला कापूस हा भिजला. कापूस भिजल्यामुळे ओलाव्याचे प्रमाण हे जास्त राहिले आहे. तसेच यावर्षी नांदेड जिल्ह्यात २ लाख ३१ हजार ८१० हेक्टर, परभणी जिल्ह्यात २ लाख २ हजार ३१६ हेक्टर, हिंगोलीत ४७ हजार ८२४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. कापूस भिजल्याने परिणामी किरकोळ व्यापारी आधारभूत किंमत दरापेक्षा दोन ते … Read more