जिल्ह्याच्या गरजेनुसार आरोग्य सुविधांवर भर द्या – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा बळकट करावी लागणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसाठी लागणारी सामुग्री खरेदी करताना गरजेनुसार आरोग्य सुविधा उपकरणे खरेदीवर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी दिले. येथील जिल्हा नियोजन … Read more

मत्स्यव्यावसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – दत्तात्रय भरणे

मुंबई – राज्यातील मत्स्यव्यवसायिकांना देण्यात येणारा मत्स्य विक्री परवाना, डिझेल विक्री परतावा रक्कम,वरळी कोळीवाडा येथील कोळी बांधवांचे प्रश्न प्राधान्याने  सोडविणार असल्याची ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मंत्रालयातील दालनात राज्यातील मच्छिमार बांधवांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी या बैठकीला उपसचिव श्रीनिवास शास्त्री,मत्स्यव्यवसाय सहआयुक्त रा.ग.जाधव, मत्स्यव्यवसाय सहआयुक्त (सागरी) सं. … Read more

भेसळमुक्त, सकस आहाराला नागरिकांनी प्राधान्य द्यावे – राजेंद्र शिंगणे

औरंगाबाद – सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी सकस, चांगले, सर्व जीवनसत्वे असलेले आणि भेसळमुक्त अन्नाचे सेवन करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचे अन्न नागरिकांना मिळावे यासाठी शासनस्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  अन्न औषध प्रशासन विभागाकडून आस्थापनांची तपासणी, दोषींवर कारवाई करण्यात येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला शासनाकडून प्राधान्य देण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी  सांगितले. … Read more

वैद्यकीय क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्राधान्याने सुरु करावेत – अमित देशमुख

मुंबई – कोविडनंतर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक विस्तारणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यावश्यक असणारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम प्राधान्याने सुरु करावेत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेप्टनंट जनरल डॉ. माधुरी कानेटकर यांनी आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. … Read more

विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य – उदय सामंत

औरंगाबाद – विद्यार्थ्यांच्या विकासाला केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे. कमवा आणि शिका, स्पर्धा परीक्षा केंद्रे, प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी आज सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात व्यवस्थापन, अधिसभा, विद्या परिषद सदस्य आणि विद्यार्थ्यांशी श्री. … Read more

शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज – राज्यपाल

अहमदनगर – कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या  विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून  देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान … Read more

आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण शासनाच्या प्राधान्यक्रमावर – अजित पवार

पुणे –  कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना सातत्यपूर्ण दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार दिगंबर भेगडे आदी उपस्थित होते. … Read more

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आराखड्यानुसार प्राप्त निधी सर्व यंत्रणांनी प्राधान्यक्रम ठरवून विहीत मुदतीत खर्च करावा – जयंत पाटील

सांगली – जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 चा आराखडा 404 कोटी 79 लाखाचा असून यामध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 320 कोटी, विशेष घटक कार्यक्रमासाठी 83 कोटी 81 लाख आणि आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 98 लाख रूपये असा मंजूर नियतव्यय आहे. यापैकी माहे सप्टेंबर अखेर शासनाकडून प्राप्त तरतूद 170 कोटी 31 लाखाची असून यामधील 55 कोटी 33 … Read more

नाबार्डकडून अधिकाधिक अर्थसहाय्यासाठी विभागांनी क्षेत्रांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा – उद्धव ठाकरे

मुंबई – राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रातील प्रकल्प, योजनांना अर्थसहाय्याची गरज असते. त्यासाठी नाबार्डकडून अधिकाअधिक अर्थसहाय्य मिळवणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील विविध विभागांनी त्यांच्याशी निगडीत क्षेत्रांबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर. चिंताला यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी झालेल्या चर्चेत … Read more