राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा – अजित पवार

पुणे – जिल्ह्यातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविडविषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. पुढील आठवड्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती पाहून निर्बंधात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले. विधान भवन येथे आयोजित … Read more

ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा – नरेंद्र मोदींचा इशारा

मुंबई : कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता … Read more

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून कोविडबाधित परिवारापर्यंत लाभ पोहोचवावे – नीलम गोऱ्हे

मुंबई – कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी समन्वय साधून कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी व कोविडमुळे बाधित परिवारापर्यंत लाभ पोहचवावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिल्या. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे, नाशिक, धुळे, जालना, जळगाव, पालघर जिल्ह्यात दौरे केले होते. त्यावेळी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी … Read more

‘या’ जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा ३० जानेवारी २०२२ बंद

पुणे – जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि ३० जानेवारी २०२२ पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा (School) बंद ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी दिले. विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत … Read more

जिल्ह्याच्या गरजेनुसार आरोग्य सुविधांवर भर द्या – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा बळकट करावी लागणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसाठी लागणारी सामुग्री खरेदी करताना गरजेनुसार आरोग्य सुविधा उपकरणे खरेदीवर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी दिले. येथील जिल्हा नियोजन … Read more

राज्यात पुन्हा निर्बंध; आज नवी नियमावली जाहीर होणार

मुंबई – राज्यातल्या कोविड Covid रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध  लावता येतील यावर  टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता … Read more

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र

मुंबई – कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस बंद असलेले पर्यटन आता सुरू झाले असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाले आहे. या दर्जेदार सेवांची आणि सवलतींची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे मंत्रालय, मुख्य इमारत येथील प्रांगणात दिनांक 22 ते … Read more

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे – वर्षा गायकवाड

मुंबई – कोविड-१९  (covid) च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ (covid) च्या पार्श्वभूमीवर … Read more

रॅपिड आरटीपीसीआर चाचणीचे दर निश्चित – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – कोविड विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या रॅपिड (Rapid) आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मंत्री श्री.टोपे यांनी सांगितले की, पारंपरिक आरटीपीसीआर चाचणी पेक्षा रॅपिड (Rapid)  आरटीपीसीआर चाचणीचे निदान … Read more

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती निश्चित – यशोमती ठाकूर

मुंबई – कोविड (covid) प्रादुर्भावामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. मागील दोन वर्षात कोविडमुळे (covid)  विधवा झालेल्या महिलांना त्यांच्या मालमत्ताविषयक हक्कापासून वंचित ठेवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे या महिलांचे मालमत्ताविषयक व अन्य … Read more