Periods Mood | टीम कृषीनामा: मासिक पाळी सुरू असताना महिलांचा मूड प्रत्येक क्षणी बदलत असतो. मासिक पाळीमध्ये महिलांना वेदनांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू असताना थकवा, अस्वस्थता, झोप न लागणे इत्यादी समस्या उत्पन्न होतात. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये महिलांचे मुड सतत बदलत असतात. हे मूड नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी अनेक महिला वेगवेगळे पर्याय शोधत असतात. मासिक पाळी सुरू असताना मुड नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.
स्वच्छता राखा (Maintain cleanliness-For Periods Mood)
मासिक पाळी सुरू असताना स्वच्छतेची काळजी घेतल्याने मूड सुधारू शकतो. आपल्या आजूबाजूला किंवा शरीराच्या स्वच्छतेचे अभावामुळे मुड खराब होऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान कपडे आणि शरीराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे मासिक पाळीमध्ये मूड चांगला ठेवण्यासाठी स्वच्छ राहिले पाहिजे.
फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा (Consume fiber rich foods-For Periods Mood)
मासिक पाळी सुरू असताना फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने मूड चांगला राहू शकतो. यासाठी तुम्ही रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये सलाडचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर मूड नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही जेवणापूर्वी फळांचे सेवन करू शकतात. हंगामी फळांचे सेवन केल्याने आरोग्यासोबतच मूड चांगला राहू शकतो.
व्यायाम करा (Do exercise-For Periods Mood)
मासिक पाळी सुरू असताना महिला व्यायामाला आराम देतात. पण व्यायाम न केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मासिक पाळी सुरू असताना तुम्ही हलक्या स्वरूपाचा व्यायाम करू शकतात. हलका व्यायाम केल्याने मूड चांगला राहू शकतो.
मासिक पाळी सुरू असताना मूड नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही वरील गोष्टी करू शकतात. त्याचबरोबर मासिक पाळीतील वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.
हीटिंग पॅड (Heating pad-For Periods Cramps)
मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी हीटिंग पॅड तुमची मदत करू शकतो. हीटिंग पॅड स्नायूंना आराम देतो आणि वेदना कमी करतो. हीटिंग पॅड वापरताना तो खूप गरम नसावा. कारण हीटिंग पॅड खूप गरम असल्यामुळे त्वचेला जळजळ आणि नुकसान होऊ शकते.
व्यायाम (Exercise-For Periods Cramps)
व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिनचे उत्पादन वाढते. एंडोर्फिन एक नैसर्गिक पेन किलर म्हणून काम करते. मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी तुम्ही काही निवडक योगासने करू शकतात किंवा वॉक करू शकतात. मासिक पाळी दरम्यान हलके व्यायाम केल्याने तुम्हाला वेदनांपासून सुटका मिळू शकते.
कॅमोमाइल चहा (Chamomile tea-For Periods Cramps)
कॅमोमाइल चहा वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या चहामध्ये हळद आणि आले यांसारखे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदनेतून मुक्त होण्यासाठी तुम्ही या चहाचे सेवन करू शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या