‘हे’ घरगुती उपाय करून अवघ्या ५ मिनिटात मिळवा काळ्या मानेपासून मुक्तता

मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हात  नसून मान लाल होऊन जाते. काळ्या मानेपासून मुक्तता मिळवण्यासाठी चला तर जाणून घेऊ घरगुती उपाय……

  1. बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मानेचा काळपटपणा दूर करू शकता. यासाठी, तुम्हाला बेकिंग सोड्यात थोडेसे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करायची आहे. ती तुमच्या मानेवर लावा. थोडा वेळ ठेवा. नंतर, पाण्याने धुवा. हा प्रयोग तुम्ही थोडे थोडे दिवसानी केलात, तर तुम्हाला फरक पडलेला दिसेल.
  2. एक नरम टॉवेल गरम पाण्यातून काढून व्यवस्थित पिळून घ्या. या टॉवेलने मानेच्या जवळपासची जागा रगडून स्वच्छ करून घ्या टॉवेलमधून निघत असलेल्या वाफेने रंध्रे खुलतील. थोड्या वेळाने याठिकाणी मॉईश्चरायजर लावा.
  3. लिंबाप्रमाणे बटाटा हा सुद्धहा नैसर्गिक ब्लीचचे काम करतो. त्यात असलेले तत्व हे त्वचेचा रंग चमकदार करण्यास मदत करतात. बटाटा सोलून त्याचा रस थोड्या वेळासाठी जर मानेवर लावलात, तर तुम्हाला तुमच्या मानेच्या रंगात नक्कीच फरक जाणवेल.
  4. नारळाच्या तेलाने त्वचेवरील घाण निघून जाते आणि रंध्रे स्वच्छ होतात. या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा.
  5. लिंबू आणि मध यांचे मिश्रण आंघोळीच्या अर्धा तास आधी मानेला लावून ठेवा आणि आंघोळ करताना मान स्वछ धुवून टाका. जर तुम्ही असे केलेत, तर मानेचे काळेपण नाहीसे होईल व सुरकुत्यांची समस्येचे पण निवारण होईल.

महत्वाच्या बातम्या –