भेंडीला वर्षभर आणि भरपूर मागणी असते. पश्चिम महाराष्ट्रात भंडीचे उत्पादन जास्त घेतले जाते. तसेच कोकणातील ठाणे जिल्ह्यात मुरबाड, भिवंडी, कल्याण, शहापूर या भागातही भेंडीची लागवड मोठ्या कीड व रोगांचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते.
खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत भेंडीची लागवड करता येते. भेंडीची लागवड खरीप हंगामासाठी ६o x ६० सेंमी. तर उन्हाळयात ४५ × ४५ सेंमी. अंतरावर सरी-विरंबा पद्धतीने बी टोकून करावी. खरिपातील लागवडीसाठी हेक्टरी ८ ते १० किलो, तर उन्हाळ्यात हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. हेक्टरी १० ते १२ टन कुजलेले ट्रायकोड़माने संवर्धित असे शेणखत. 100 किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २५ किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फुरद व पालश तसेच एकतृतीयांश नत्र मातीतून द्यावे. उरलेले नत्र दोन समान हप्त्यांत ३Q व ६० दिवसांनी द्यावे. भाजीपाला पिकाचे उत्पादन कमी येणे व कमी दर्जाचा भाजीपाला तयार होणे यासाठी त्यावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हे महत्त्वाचे कारण आहे. सर्वसाधारणपणे भाजीपाल्यामध्ये किडींमुळे २० – ३० टक्के नुकसान होते. त्यामुळे अशा किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करणे जरुरीचे आहे.
भेंडीवरील महत्त्वाच्या किडी-
- ठिपक्याची अळी – ही भेंडीवरील सर्वात नुकसानकारक कीड आहे व भेंडीशिवाय कापूस, अंबाडी इत्यादी पिकालासुद्धा ती नुकसानकारक आहे. याची अळी तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात. ही अळी सुरुवातीला झाडाचा शेंडा पोखरते, त्यामुळे शेंडा वाळून जातो. नंतर अळी कळ्या व फळामध्ये शिरते. त्यामुळे कळ्या व फुले परिपक्व न होताच गळून पडतात. जी फळे झाडावर राहतात ती वाकडी होतात व त्यावर अलीने केलेले छिद्र आणि तिची विष्ठा दिसते व फळे खाण्यास योग्य राहत नाहीत.
- घाटेअळी – ही कीड बहुभक्षी असून भेंडीशिवाय कापूस, हरभरा, तूर, टोमॅटो, ज्वारी इत्यादी अनेक पिकावर उपजिविका करते. या किडीची अळी फळे पोखरते व त्यावर उपजिविका करते. या किडीचा मादी पतंग झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर, काळ्यावर व फळावर अंडी देते. अंड्यातून निघणारी अळी ही फळाचे नुकसान करते. नंतर अळी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.
- तुडतुडे – तुडतुडे ही भेंडीवरील सर्वात महत्त्वाची रस शोषण करणारी कीड आहे. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व हिरवट पिवळे असून पंखावर काळे ठिपके असतात. ते नेहमी तिरके चालतात. या किडीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस वाढून त्यातील रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पाने आकसतात व कडा तपकिरी होतात.
- पांढरी माशी – रोगाचा माशी ही भेंडीवरील रस शोषक कीड असून विषाणूजाण्य रोगाचा प्रसार करते. प्रौढ माशी आकाराने लहान असून पंख पांढुरके असतात व शरीरावर पिवळसर झाक असते. डोक्यावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात. पिल्ले पानाच्या खालच्या बजूने आढळतात. त्यांचा रंग फिकट पिवळा किंवा पिवळा असतो. पांढऱ्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात. याशिवाय पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात. याशिवाय पिल्ले आपल्या शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे पाने चिकट होतात. त्यावर बुरशीची वाढ होते व पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ठ परिणाम होतो.
- मावा – मावा पिवळसर किंवा काळा गोलाकार असून त्याच्या पाठीवर मागच्या बाजूने सूक्ष्म अशा दोन नलिका असतात. मावा व त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने व कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. याशिवाय शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. कालांतराने त्यावर काळी बुरशी चढते व झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
भेंडीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापन –
- उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील किडींच्या सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खावून नष्ट होतील.
- किडींच्या पर्यायी खाद्य वनस्पती उपटून नष्ट कराव्यात.
- भेंडीची वेळेवर लागवड करावी व खताची योग्य मात्र वापरावी. नत्राचा अतिरिक्त वापर करू नये.
- पिकाची फेरपालट करावी.
- लागवडीपुर्वी बियाण्यास ७० टक्के थायोमिथॉक्झॉंम / इमिडाक्लोप्रीड ५ ग्रॅम प्रति किलो या प्रमणात बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.
- किडग्रस्त भेंडी तोडून अळीसहीत नष्ट करावीत.
- ठिपक्याची अळी व घाटेअळी यांची कामगंध सापळे शेतामध्ये सर्व्हेक्षणासाठी प्रति हेक्टरी ५ या प्रमाणात लावावे.
- पांढऱ्या माशीसाठी पिवळे किंवा चिकट सापळे प्रति हेक्टरी १० लावावेत.
- किटकनाशकाचा अनावश्यक वापर टाळावा. त्यामुळे परभक्षी कीटक जसे ढालकिडा, क्रायसोपा, सिराफिड माशी, कोळी, भक्षक ढेकूण इत्यादी व परोपजीवी कीटक जसे ट्रायकोग्राम, रोगस, ब्रॅकॉन इत्यादींचे संरक्षण होईल. त्यामुळे हानीकाराक किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण होण्यास मदत होईल.
- ठिपक्याची अळी व घाटेअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ५०,००० प्रति हेक्टरी शेतामध्ये सोडावीत.
- पांढरी माशी व इतर लहान किडींच्या नियंत्रणासाठी क्रायसोपाच्या २ अळ्या प्रति झाड सोडावेत.
- घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही २५० एलई प्रति हेक्टरी वापर करावा.
- घाटेअळीचा / ठिपक्याच्या अळीचा प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- रासायनिक किटकनाशकाचा वापर फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच करावा. स्पिनोसॅड ४५% २२२ मिली, फोझॅलोन ३५% ८६० मिली किंवा सायपरमेथ्रीन २५ % २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये लेवल तीन चे निर्बंध कायम
- राज्यात गेल्या २४ तासात ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर कोरोना मृत्यूंच्या आकड्यात घट
- काय आहे झिका आजार? माहित करून घ्या
- निर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल – छगन भुजबळ
- दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?