कापूस पणन महासंघातर्फे राज्यांमध्ये शासकीय हमीभाव केंद्राद्वारे कपाशीची खरेदी सुरू होती. पण, मागच्या दहा दिवसांपासून ही खरेदी पूर्णपणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
भाव पाडून कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको
या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून आळीचा प्रादुर्भाव राहिल्याने शेतकऱ्यांना उभा कापूस आपल्या शेतातून काढून टाकावं लागला. यातून कसेबसे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले परंतू त्याचीही खरेदी आता बंद झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे.
जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने जगबुडी पूल बंद
कापूस पणन महासंघातर्फे बीड जिल्ह्यामध्ये एकूण 27 ठिकाणी शासकीय हमीभाव केंद्राद्वारे कापूस खरेदी सुरू करण्यात आले होते. मात्र, ही खरेदी मागच्या दहा दिवसापासून बंद करण्यात आली आहे. या शासकीय हमीभाव केंद्राद्वारे शेतकऱ्यांना पाच ते साडेपाच हजार दरम्यान क्विंटलला भाव मिळत होता. त्यामुळे शासकीय खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याकडे कापूस विकण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही.
वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला https://t.co/ztHl160VoN
— KrushiNama (@krushinama) January 28, 2020