अकोला : जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात प्रगती करण्याचे पाऊल कृषी संस्था, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने उचलेले आहे. यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र संशोधन सुरू करण्याचे ठरविले आहे. जैव किटकनाशकांचा प्रभाव कायमस्वरूपी राहण्यासाठीचे संशोधन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संत्रा फळावरील डिंक्या रोगावर प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. येथे शेवगा वृक्षाच्या पानापासून ‘झींक नॅनो पार्टीकल’ याचे संशोधन करण्यात आले आहे. हे पार्टीकल जैव किटनाशकांचा अतिनिल किरणांमुळे कमी होणारा प्रभाव रोखण्याचे काम करते. जर आपण एखाद्या पिकांवर किड, रोगांवर जैव किटकनाश फवारले असेल तर प्रभाव जास्त काळ टिकून राहतो.
नॅनो पार्टीकलचा वापर केला तर जैव किटकनाशकांचा प्रभाव दिर्घकाळ टिकून राहतो. तसेच अतिरिक्त दुष्परिणाम थांबविता येतो. यात विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच पिकांसाठी करता येईन.
तसेच विदर्भामध्ये संत्र्याचे क्षेत्र हे एक लाख २५ हजार हेक्टरवर आहे. यावर डिंक्यासारखा रोग रोखण्यासाठी ‘कॉपर नॅनो पार्टीकलचा ’ वापर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यावर संध्या संशोधन सुरू आहे आणि त्यातून चांगले निकाल निघाले आहेत. पंरतु हे संशोधन अद्याप पूर्ण व्हायचे आहे.
महत्वाच्या बातम्या –
आता मुख्यमंत्री करणार कोल्हापूरच्या महापुराची पाहणी
मुंबईसह कोकण विभागात सर्वच ठिकाणी तापमान घसरले
दूध संघाच्या एकूण व निव्वळ नफ्यात वाढ – हरीभाऊ बागडे
पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – एकनाथ शिंदे