जाणून घ्या, सर्पदंश झाल्यावर काय करावे?

आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतत. याचे प्रमाण पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळते. यावेळी बरेच जण ट्रेकिंग किंवा सहलीला जाण्याचा आनंद घेतात. अशा दिवसांत सरपटणारे प्राणी दाट हिरवळीत लपून बसण्याची शक्यता असते. यावेळी सर्पदंशाचा धोका जास्त असतो.

जाणून घ्या सर्पदंश झाल्यावर काय करायचे ?

व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवणे, त्याला दिलासा देणे आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा साप बिनविषारी असतो. सर्पदंश झालेली व्यक्ती मनाने खचण्याची शक्यता असते. तिला जवळ असणाऱ्यांनी आधी धीर द्यावा तसेच वातावरण ऊबदार ठेवावे.

तसेच ज्या ठिकाणी सर्पदंश झाला असेल त्या ठिकाणी नव्या ब्लेडने किंवा कोणत्याही स्वच्छ धारदार वस्तूने किमान दोन चिरा माराव्यात. लक्षात ठेवा चिरा जास्त खोल मारू नका नाहीतर विष आणखी शरीराच्या खोल उतरण्याचा धोका वाढतो. चिरा मारल्याने रक्त आणि त्याबरोबर सापाचे विषही बाहेर निघते. कारण त्यामुळे प्राण वाचू शकतात.

याचप्रमाणे साप चावल्यानंतर काहीही खाऊ – पिऊ नका. कॅफिन अशी पेये तर नक्कीच घेऊ नका. असे केल्यास हृदयाचा वेग वाढून शरीरात विष लवकर पसरू लागते आणि तेच आपल्याला टाळायचे आहे. ‘तोंडाने विष शोषून थुंकून देणे’ ही सिनेसृष्टीने तयार केलेली एक चुकीची व धोकादायक संकल्पना आहे. याने चोखणाऱ्याच्या तोंडात विष तर पसरू शकते.

दंशाच्या जागी वेदना होतात, रक्तस्राव होऊ लागतो, सूज येते, भीतीमुळे घाम येतो. नाग-मण्यार यांच्या तुलनेने मात्र जास्त वेळ लागतो. फुरशाचे विष कमी असल्यामुळे जास्त वेळ लागतो. पण सुमारे दोन तास ते चोवीस तासांपर्यंत कधीही चिन्हे व लक्षणे दिसू लागतात.

याच प्रमाणे चावलेला साप बिनविषारी असेल तर चावलेल्या ठिकाणी दातांच्या खुणा अर्धवर्तुळाकार रचनेत असतात. मात्र एक किंवा दोन दातांच्या खुणा असतील तर मात्र विषारी असण्याचा संभव असतो. घोणस, फुरसे यांच्या दंशानंतर कमीअधिक वेळात रक्तस्राव चालू होतो.

महत्वाच्या बातम्या –

बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा उद्रेक

नागपूर, मुंबई आणि डहाणूमध्ये पाऊस, मुंबईतील किमान तापमान १३ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी

मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत अतिवृष्टी – हवामान खाते