पुणे मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने शेवगा, पावटा आणि वांग्यांच्या दरात दहा टक्क्यांनी घट झाली. तर मागणी वाढल्याने हिरवी मिरची व घेवड्याचे दर वधारले आहेत. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले आहेत. स्थानिक भागातून ओल्या तर गुजरात येथून वाळलेल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे. तसेच फळभाज्यांची आवक घटली आहे.
ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे रब्बी पिके धोक्यात
रविवारी येथील बाजारात १५० ते १६० गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून चार टेम्पो शेवगा, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी तीन ते चार ट्रक, कर्नाटक येथून तीन ते चार टेम्पो घेवडा, मध्य प्रदेशातून तीस ट्रक मटार, राजस्थान सात ते आठ ट्रक गाजर, गुजरात येथून शंभर पोती भुईमूग शेंग, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडे पाच ते सहा हजार गोणी इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले एक हजार ते १२०० पोती, टोमॅटो साडे पाच ते सहा हजार पेटी, हिरवी मिरची तीन ते चार टेम्पो, भेंडी दहा ते बारा टेम्पो, गवार आठ ते दहा टेम्पो, फ्लॉवर दहा ते पंधरा टेम्पो, कोबी आठ ते दहा टेम्पो, वांगी दहा ते बारा टेम्पो, ढोबळी मिरची आठ ते दहा टेम्पो, ओली भुईमूग शेंग ५० ते ६० पोती, पावटा सात ते आठ टेम्पो, तांबडा भोपळाची दहा ते बारा टेम्पो, कांदा १५० ट्रक, आग्रा, इंदौर, तळेगाव येथून मिळून बटाट्याची ४५ ट्रक इतकी आवक झाली.
आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, होऊ शकतात ‘हे’ आजार https://t.co/0JBRDhTq8n
— KrushiNama (@krushinama) December 30, 2019