मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अकोला , नाशिक , अमरावती , रत्नागिरीत , धुळे , चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. तर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
अकोला जिल्ह्यातही ८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कापूस, गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा, निफाड, चांदवड, दिंडोरी, तालुक्यांना अवकाळी पावसाने दणका दिला आहे. तर या जिल्ह्यात मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे, या ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मावा, करपा या रोग्णांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे,
राज्यातील रत्नागिरीत जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडलेल्यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात संत्रा, हरभरा, तूर पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात ८ जानेवारीला गारपिटीसह वादळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडला. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कपाशी, पिकांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
धुळे जिल्ह्यात ७ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे. तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Untimely rain) व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गोंडपिपरी, जिवती, कोरपना, पोंभुर्णा, मूल, भद्रावती, वरोरा, राजुरा, नागभीड व ब्रह्मपुरी या तालुक्यांत अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले.
महत्वाच्या बातम्या –
- पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढणार? अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 22 आणि 23 जानेवारीला अवकाळी पावसाची शक्यता
- शेळी पालनातून मिळेल ग्रामीण अर्थकारणाला चालना – सुनील केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘या’ जिल्ह्यातील विकास कामांचे कौतुक
- पुन्हा पाऊस! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज