मेथीचे ‘हे’ आहेत ५ महत्वाची गुणधर्म, जाणून घ्या

मेथीचे बीज आणि मेथीची पान सुगंधित व चविष्ट असतात. मेथीचे बीज फारच कडू असते. त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येते. मेथीमध्ये थायमिन, फोलिक असिड, रायबोफ्लोबीन नियासिन आयर्न, स्लेनियम, झिंक, म्यान्ग्नीज आणि म्याग्नेशियाम असते. यासोबत मेथीमध्ये जीवनसत्व k चे काही घटकपण असतात.

मेथीचे ५ महत्वाची गुणधर्म –

मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते-

काही संशोधनात असे आढळून आले आहे की मेथीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.मेथीमध्ये असलेल्या स्टेरॉईडल सेपोनिन्समुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लीसराईड चे शोषण टाळले जाते.

ह्रदयविकाराचा धोका कमी होतो-

मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या घटकामुळे ह्रदयाचे आरोग्य नियंत्रित राहते.त्याचप्रमाणे मेथीमध्ये असलेल्या पोटॅशियमुळे सोडीयमच्या कार्यावर नियंत्रित राहते ज्यामुळे हुदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतात.

ताप व घसा खवखवणे यावर गुणकारी-

ताप असल्यास मेथी एक चमचा लिंबू व मधासोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो.तसेच खोकला व घसा खवखवत असल्यास त्यावर देखील मेथी गुणकारी आहे.

स्तनपान करणा-या महिलांमध्ये दुधाचे प्रमाण वाढते-

मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दूधाच्या प्रमाणात वाढ होते.त्यामुळे स्तनपानकरणा-या महिलांना मेथी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

केसांच्या समस्या कमी होतात-

मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात. केस गळत असल्यास अथवा पातळ असल्यास दररोज तुमच्या कोकनट ऑईलमध्ये मथी दाणे रात्रभर भिजत ठेवा व नंतर केसांना त्याचा हलक्या हाताने मसाज करा. मेथींमुळे केसांमधील कोंडा देखील कमी होतो.

महत्वाच्या बातम्या –