थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडू नये यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

हिवाळ्याला सुरुवात झाली आहे,,, या हिवाळ्यात अनेकांना एकाच समस्येला समोर जावं लागतं ती समस्या म्हणजे कोरडी त्वचा…. अनेकजण यावर अनेक उपाय शोधत असतात. मात्र ते उपाय कायमस्वरुपी नसून ते तेवढ्यापुरते मर्यादित असतात. यावर जर रामबाण उपाय मिळाले तर सगळ्यांना कोरडी त्वचा होण्यापासून बचाव करता येईल. मात्र ते रामबाण उपाय जर घरगुती असेल तर… आश्चर्य वाटलं ना….?  होय तर विविध प्रकारचे किंवा विविध कंपनीचे मॉईच्यरायझर न वापरता आपली कोरड्या त्वचेची समस्येचं निवारण होऊ शकत. चला तर जाणून घ्या उपाय ….

  •  गरम पाण्याने त्वचा कोरडी पडते त्यामुळे तिला ताजेतवाने ठेवण्यासाठी चेहरा धुताना किंवा अंघोळ करताना कोमट पाणी वापरा. 
  • पाणी तुमच्या त्वचेला तजेलदार राहण्यास मदत करते. दिवसभरात किमान ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
  • साबण त्वचेतील आर्द्रता नाहीशी करतो त्यामुळे साबण वापरणे टाळा.
  •  घराबाहेर पडण्याआधी जास्त SPF असलेली सनस्क्रीन उघड्या त्वचेवर लावा. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होईल. 
  • त्वचेला स्वच्छ ठेवण्याकरिता सुगंधी किंवा अल्कोहोल मिश्रित बॉडी क्लींजर्स वापरण्याऐवजी नैसर्गिक क्लींजरचा वापर करा. ग्लिसरीन किंवा जोजोबा ऑइल असलेले क्लींजर्स त्वचा कोरडी पडू देत नाहीत

महत्वाच्या बातम्या –