ओट्स खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ओटस् मध्ये असे काही गुणधर्म दडलेले असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर आणि सौंदर्यावर चांगले फायदे झालेले दिसून येऊ शकतात. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओटस् हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. चला तर जाणून घेऊ फायदे……

  • तुम्ही लठ्ठ असल्यास, रोज ओट्स खावेत. यामध्ये लो कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीज कमी असतात. ज्यामुळं वजन कमी होण्यास फायदा होतो. शिजलेले ओट्स शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.
  • ओट्स खाल्ल्यामुळं बद्धकोष्ठतेपासून सुटका होते. यातील अनसॉल्युबल फायबरमुळं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनशक्ती वाढते. ओट्समध्ये कॅल्शियम, पोटेशियम, विटामिन बी आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं. तुमच्या नर्व्हस सिस्टिमला यापासून व्यवस्थित राखून ठेवते.
  • उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या लोकांना रोज ओट्स खाणं अतिशय उपयुक्त आहे. नियमित ओट्स खाण्यामुळं तुम्हाला रक्तदाबाची समस्या उद्भवत नाही. तर यात असणाऱ्या फायबरमुळं रक्तदाब वाढण्याची शक्यता कमी होते.
  •  रोज ओट्स खाल्ल्यामुळं ह्रदयाशी निगडीत आजार होण्याची संभावना कमी होते. बीटा ग्लुकेन फायबरमुळं कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहते. तसंच यामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सीडेंट एवनेथ्रामाइड्स एलडीए कोलेस्ट्रॉलच्या फ्री रेडिकल्सपासून सुटका मिळते. तसंच ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
  • मधुमेही व्यक्तींसाठी ओट्स खाणं गुणकारी असतं. वैद्यांच्या सांगण्यानुसार, लेमन ओट्स खाल्ल्यास, साखरेचं शरीरातील प्रमाण कमी होतं. शिवाय नाश्त्यामध्ये ओट्स खाल्ल्यामुळं जास्त भूक न लागता पोट साफ राहतं. पोट साफ राहिल्यामुळं इतर आजार होण्याची संभावना नसते.

महत्वाच्या बातम्या –