शेतीसाठी पाणी हा अनमोल ठेवा आहे. तो मर्यादित आहे. त्याचा वापर काटेकोरपणे करायला हवा. फळझाडे, नगदी पीके, भाजीपाला, फुलझाडे या सर्वासाठी ठिबक सिंचन करणे काळाची गरज आहे. ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्यांचे जाळे पसरतात. ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला.
जाणून घेऊ या ठिबक सिंचनाचे फायदे
ठिबक सिंचनाने रोज गरजेनुसार पाणी दिल्याने पिकांना टन पडत नाही. हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खांद पडत नाही. त्यामुळे झाडांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. याच बरोबर उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते. तसेच कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते.
तसेच पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते. याच बरोबर पाण्याची ३० ते ८०% बचत होते. बचत झालेल्या पाण्याचा दुसर्या क्षेत्राला ओलीत करण्यासाठी वापर करता येतो. तसेच क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तर पिकांचे उत्पादन घेता येते. चढ उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात.
याच बरोबर कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन काढता येते. जमिनीची धूप थांबते. पाणी साठून राहत नाही. जमिनी खराब होत नाही. ठिबकने द्रवरूप खत देता येतात. १००% खताचा वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो.
तसेच पाणी देण्यासाठी रानबांधनीची गरज नसते. त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते. चिंतामुक्त शेतीसाठी ठिबक सिंचन वरदानच म्हंटले पाहिजे. निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मराठवाड्यातील पहिली योजना, सीएनजीमार्फत घरोघरी मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस
- जिरायतसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार, व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रु. प्रति हेक्टर मदत देणार – बाळासोब थाेरात
- ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणार ५५५.३९ कोटी
- अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य – विजय वडेट्टीवार