आजकाल अनेकांना चष्मा लागतो. पण काही जणांना चष्मा लावल्यामुळे नाकावर खूणा तयार होतात. त्यामुळे चष्मा काढल्यानंतर चेहरा (face) खराब दिसतो. नाकावर, डोळ्यांच्या बाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याच्या भागांवर चष्म्याच्या आकारानुसार डाग पडत असतात. तुम्हाला सुध्दा हीच समस्या असेल तर काही घरगुती (Domestic ) घटकांचा वापर करुन तुम्ही चेहऱ्यावर असलेले डाग कोणताही खर्च न करता काढू शकता.
मध (Honey)– चष्म्याच्या खुणा कमी करण्यात मध फायदेशीर आहे. काही थेंब मध त्या ठिकाणी लावा. मध आणि लिंबू मिसळूनही तुम्ही लावू शकता.
बटाटा (Potatoes)– बटाट्यामध्ये त्वचेसाठी फायदेशीर असलेले अनेक गुणधर्म असतात. यासाठी एका कच्च्या बटाट्याची साल काढून त्याचा रस काढून घ्या आणि 15 मिनिटांपर्यंत चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
अॅलोवेरा(Aloe vera) – अॅलोवेराचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर अॅलोवेरा जेल हातावर घेऊन डोळ्यांच्या आजूबाजूला लावून गोलाकार फिरवा.
गुलाबपाणी (Rose water) – गुलाब पाण्याचा उपयोग चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी उपयोग करण्यात येतो. कापसाच्या मदतीने गुलाब पाणी चेहऱ्यावर लावा. काही वेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
टोमॅटो (Tomatoes) – टोमॅटो, व्हिनेगर या पदार्थांच्या सहाय्याने डाग कमी करता येतात. हे पदार्थ स्किनवर लावताना विशेष काळजी घ्या. फक्त डागांवरच लावा. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी लावू नका.
महत्वाच्या बातम्या –
- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे – वर्षा गायकवाड
- ओमायक्रॉन विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा – छगन भुजबळ
- महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उदय सामंत
- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
- शर्यत पुन्हा सुरु करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण; बैलगाडा शर्यत प्रेमी आणि शेतकरी आनंदी