Share

ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लसीकरणाला अधिकाधिक गती द्या – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

जळगाव  – जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रॉनचा (Omycron) संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, घरोघरी (Door To Door ) जाऊन लसीकरण मोहीम पूर्ण करावी, कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

जळगाव जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या कामकाजाचा आणि कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांची आढावा बैठक येथील नियोजन भवनात आयोजित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत  होते. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, महापौर जयश्री महाजन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, महापालिका आयुक्त सतिष कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar)  म्हणाले की, जिल्ह्यात अधिकाधिक विकासकामे होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून संपूर्ण निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. या निधीच्या माध्यमातून कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यावे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रीकल ऑडीट करावे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वोच्च ऑक्सिजन मागणीच्या तिप्पट ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे नियोजन करावे, मास्क वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी. कोविड काळात सेवा देणाऱ्या कोणत्याही यंत्रणांचे देयक थकीत ठेवू नये यासाठी निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल. विविध विकास कामांत कंपन्याकडून सामाजिक दायित्व निधी (CSR) मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याच बरोबर कृषि, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी खर्च करावा. पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडू नये. शहराच्या रस्त्यांसाठी देण्यात आलेला निधी खर्च करुन दर्जेदार रस्ते तयार करावेत. जिल्हा वाषिक योजनेच्या माध्यमातून महसूल तसेच पोलिस यंत्रणांच्या तालुकास्तरीय कार्यालयांना वाहने उपलब्ध करुन देण्यात येतील.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य बातम्या (Main News) राजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या