चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त फळे

शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य पाहावे, असे म्हणतात. त्यासाठी मुली त्याचप्रमाणे मुले देखील अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. परंतु ही प्रसाधने त्वचेला हानिकारक ठरण्याची शक्यता असते. आपल्या आहारावरही चेहऱ्याचा रंग अवलंबून आहे. योग्य आहार घेतल्याने रंग उजळतो. पाहा आपला रंग उजळण्यासाठी काय खावे.

बीट – बीटमध्ये ‘व्हिटॅमिन’, ‘सोडियम’, ‘पोटॅशियम’, ‘फॉस्फोरस’, ‘क्लोरीन’, ‘आयोडिन’, इत्यादी सत्व असतात. याच्या सेवनाने त्वचेचे छिद्र खुले होतात. त्वचेच्या समस्यांपासून वाचण्यासाठी बीटचा रस दररोज प्यावा आणि याचा फेस पॅकही लावावा.

केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती तेल वापर

पपई – पपईमध्ये असलेलं कॅरोटिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. डोळ्यांचं तेज वाढविण्यासाठी पपई खावी. पपईमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ सोबतच ‘व्हिटॅमिन ए’, ‘ई’ आणि ‘अँटीऑक्सिडंट’ देखील असतात. त्यामुळे त्वचेवरील डाग दूर होतात आणि पोटाचे विकारही मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होते.

ब्रोकली – ब्रोकलीमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘ई’ अधिक प्रमाणात असते. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट पण असतात. त्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत होते.

डाळिंबाचे बाजारभाव कोसळले

सोयाबीन – सोयाबीनच्या प्रत्येक उत्पादनाचा ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘जस्त’ असते. सोयाबीनपासून बनलेले पदार्थ खाल्ल्याने पुरळ आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो. आपण आपल्या डाएटमध्ये सोयाबीनचा समावेश करून आपली निर्जीव त्वचा अधिक चमकदार बनवू शकतो.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरीत भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. म्हणून त्याच्या नियमित सेवनानं वाढत्या वयाचा त्वचेवरील प्रभाव कमी होऊ शकतो. त्यात ‘व्हिटॅमिन सी’ पण भरपूर प्रमाणात असतात.