बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. या आजारावर मनुके आणि मध अत्यंत उपयोगी ठरतात. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा मात करण्यास मदत करतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. अधिक त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- मनुके आणि मध यांच्यात कॅल्शियमची मात्रा अधिक असल्याने सांधेदुखीचा त्रास सतावत नाही.
- मनुके तसेच मधामध्ये लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. यात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे खाल्ल्याने चांगली झोप येते.
- मनुके आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो.
- मनुके तसेच मधात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचनशक्ती सुधारते.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : दि. ८ सप्टेंबर २०२१
- सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
- राज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांचे झाले लसीकरण
- मंत्रिमंडळ मोठा निर्णय: महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार पाऊस सुरुच; तर ‘या’ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा