पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून किती दिवस माफी मागणार ? राहुल गांधींचा संसदेत सवाल

मुंबई –  गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत.  हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकर्‍यांच्या मागण्यांपुढे दीड वर्षानंतर का होईना अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. यावर आता पुन्हा एकदा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लोकसभेत बोलताना शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

संसदेत बोलत असताना राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचे अनेक मुद्दे उपस्थित केले आहे. ‘शेतकऱ्यांना त्यांचे हक्क, नोकऱ्या आणि नुकसानभरपाई मिळावी. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात जवळपास ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देश आणि शेतकऱ्यांची माफी मागितलेली आहे. त्यांनी हे मान्य केलं आहे की त्यांच्याकडून चूक झाली, पण आता पंतप्रधान किती वेळा माफी मागणार?,’ असा सवाल करत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

यानंतर राहुल गांधी कृषीमंत्र्यांवर टीका करत म्हणाले की, तुमचे सरकार म्हणते की मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची यादी नाही. मी संसदेत आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण यादी ठेवत आहे. पंजाब सरकारने ४०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई दिली आहे. याशिवाय १५२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी दिली आहे. माझ्याकडे पूर्ण यादी असल्याचे ते म्हणाले आहेत .

महत्वाच्या बातम्या –