प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी तरुण-तरुणींबरोबरच सर्वजण वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने वापरतात. बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात. ही अवस्था जरी कुणाला आवडत नसेल तरी प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. मात्र योग्य वेळी काही उपाययोजना केली तर या समस्येपासून काही प्रमाणात समाधान मिळू शकते.
- अर्धा चमचा दुधावरची साय घेऊन त्यात १०-१२ थेंब लिंबाचा रस टाका. हे मिश्रण चांगल एकत्र करून घ्या व रोज रात्री झोपतांना चेहऱ्यावर लेप करा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावर लेप करण्यापुर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
- कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉईश्चर वाढते, चेहरा साफ बनतो. तसेच चेहरा स्मूथ होऊन त्वचा लवचिक बनते.
- चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी किंवा लवकर सुरकुत्या पडू नये यासाठी चेहऱ्याचा नियमित मसाज करणे खूप फायद्याचे ठरते. अनेकांना प्रश्न पडेल की मसाज कसला करावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी तेलाचा मसाज खूप उपयोगी आहे. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार वेगवेगळे तेल वापरू शकता.
- पिकलेली केळी व पिकलेली पपई एकत्र करून मिश्रण तयार करा. यामध्ये थोडं मध टाका. एकत्र करून चेहऱ्यावर लेप करावा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. मसाज झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा व कॉटनच्या नॅपकिनने चेहरा स्वच्छ पुसावा. हा लेप आठवड्यातुन ३ वेळा करावा.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
- राज्यात आज ठिकठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
- जायफळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
- साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी
- राज्यात उद्या ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
- जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; तर ‘या’ धरणांच्या साठ्यामध्ये वाढ