दात स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासावेत असं डॉक्टर सांगतात. मात्र फक्त असं केल्याने दातांचं आरोग्य सुधारतं असं नाही. त्यासाठी हिरड्यांची काळजी घेणं तितकचं आवश्यक आहे.
दातांसोबतच हिरड्यांचं आरोग्यही जपणं महत्त्वाचं आहे. दातांचे आरोग्य हे हिरड्यांची मजबूती तसेच स्वच्छतेवर अवलंबून असतं. हिरड्या स्वच्छ नसतील तर त्याचा परिणाम दातांवर होतो. यामुळे दात तुटणे, रक्त येणे अशा समस्या उद्भवतात.
- हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी कच्च्या भाज्या चावून खाव्यात.
- ‘सी’ जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश असावा, यामुळे हिरड्या मजबूत होतात. आवळा, संत्री तसेच मोसंबी अशी फळे खावीत.
- तोंडाचा व्यायाम केल्याने हिरड्यांचं आरोग्य सुधारते. वरचे दात खालच्या दातांवर दाबावेत. असे केल्याने हिरड्यांतील रक्ताभिसरण वाढते आणि हिरड्यांमध्ये ताकद येते.
- दिवसातून दोनवेळा दात घासावेत.
- साखरेच्या सेवनाने बॅक्टेरिया निर्माण होतात. त्यामुळे साखरेचे सेवन शक्यतो कमी करावे. हे बॅक्टेरिया हिरड्यांमध्ये साचून राहतात यामुळे दात किडतात आणि दातातून रक्त येते.
- काहीही खाल्यानंतर दातात अडकलेले खाद्यपदार्थांचे कण टूथपिकने काढावेत. दातांमध्ये अडकलेले हे कण कालांतरानं कूजतात. त्यामुळे हिरड्यांचं आरोग्य बिघडतं.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ भागात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात पावसाने लावली जोरदार हजेरी
- जाणून घ्या मुतखड्याची लक्षणे व त्यावरील काही उपाय….
- शेतक-यांनी बियाणे खरेदी करतांना खात्री करुनच बियाणे खरेदी करावी – कृषी विभागाचे आवाहन
- पुढील २ दिवस राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता