जालना: पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्श का खंडित करतात? असा जाब विचारत माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांनी अधिकाऱ्यांना नियमाचे उल्लंघन केल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला दिला.
पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन (Power connection) तोडले तर याद राखा असा इशारा बबनराव लोणीकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तुम्हाला शेतकऱ्यांना जगू द्यायचे नाही का? असा सवाल उपस्थित करीत लोणीकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून वसुली करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच अनेक शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तगादा न लावता सवलत द्या अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच महावितरणने वीजतोडणी मोहीम बंद न केल्यास अधीक्षक अभियंता कार्यालयावर आंदोलनाचा इशारा बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- हवामान अंदाज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता
- उकडलेले अंडे खाणार्या ९९% लोकांना माहित नाही ही गोष्ट, जाणून घ्या
- सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – अनिल परब
- ‘हे’ घरगुती उपाय केल्याने ‘5’ मिनिटांत कमी होईल पित्ताचा त्रास