शेतकऱ्याने फक्त ४१ दिवसात चार एकर कोथिंबीरीच्या पिकात तब्बल साडेबारा लाखांचं घेतलं उत्पन्न

नाशिक – संसर्गजन्य आजार कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेला लॉकडाऊन या संकटाच्या काळात देशवासीयांना आधार देण्यात सर्वात आघाडीवर कोण असेल तर तो ‘शेतकरी वर्ग’ आहे याची प्रचिती सर्वांनीच घेतली. शेतकरी काय करु शकतो याचा अनुभव याची देही याची डोळा नागरिकांनी घेतला. समाज माध्यमं बुद्धीला खाद्य पुरवतील पण पोट भरण्यासाठी शेतकऱ्याने पिकवलेलं धान्यच खावं लागतं. त्याला कुठलाच पर्याय नाही, ते धान्य गुगल, फेसबुक किंवा ट्विटर आणि इतर कोणतंच माध्यम देऊ शकणार नाही हे वास्तव आहे. या वास्तवाची जाणीव ठेवत नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे राहणाऱ्या विनायक हेमाडे यांनी लॉकडाऊन काळात कोशिंबीरीचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे.

साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

चार एकर कोथिंबीरीच्या पिकात १२ लाख ५१ हजार रुपयांचं उत्पन्न काढत हेमाडे यांनी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. ४५ किलो कोथिंबीरीच्या बियाण्यातून त्यांनी हे विक्रमी उत्पादन घेतलं आहे. अवघ्या सव्वा महिन्याच्या काळात हे पीक त्यांनी घेतलं आहे. तयार झालेलं सर्व पीक त्यांनी दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांना दिलं आहे. एकूण १२ लाख ५१ हजार रुपयांसाठी हा सौदा ठरला असून पीक लागवड करताना कुठल्याही अवास्तव मोबदल्याची अपेक्षा मी केली नाही असं हेमाडे यांनी सांगितलं.

शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

विनायक हेमाडे यांचा चेहऱ्यावर समाधानी भाव असलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अगदी माफक खर्चात, भरघोस फायदा मिळाल्याने हेमाडे यांच्या आनंदाला भलतंच उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

कर्जवाटप बाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने रुग्ण बरे – राजेश टोपे