देशात गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई – जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे 6 हजार 822 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात देशात तब्बल 220 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात  ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव झाला असून आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 23 रुग्ण सापडले आहेत.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या 95 हजार 14 झाली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 73 हजार 757 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या  आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासात दिवसभरात 10 हजार 4 रुग्ण बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 79 हजार 612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –