मुंबई: मुंबई आणि पुणे पालिकेने (Municipal Corporation) शाळा सुरु करण्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सुरुवातीला १ डिसेंबर पासून शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता ओमायक्रॉनच्या (omicron) संसर्गामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण करत असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यावेळी दिली आहे. स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन, शाळांविषयी निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना व्हायरसचा नवा ओमिक्रोनचा व्हेरिएंट आल्यामुळे मुंबई (Mumbai), पुणे येथील शाळा (School) बंदच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
टास्क फोर्सशी चर्चा करून त्याच सोबत कोरोना व ओमायक्रॉनच्या संसर्गाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवी वर्गाच्या शाळा आता १५ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता मुंबई पुण्यातील शाळा १५ डिसेंबर पासून सुरू करण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कोरोना व त्याच सोबत ओमायक्रॉनच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मगच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची मदतीची भूमिका – जयंत पाटील
- ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
- अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील – विश्वजीत कदम
- परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा – विजय वडेट्टीवार
- पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी आता एकदाच अर्ज करा; मोबाईल ऍपद्वारे योजनांचा लाभ, प्रतिक्षा यादीचीही तरतूद