तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही वास येतो. दुसरे कारण म्हणजे तोंडातल्या अस्वच्छतेमुळे जंतूंची वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया होणे. घाण वास येण्यामागे बहुतेक वेळा हे दुसरे कारण आढळते. म्हातारपणात लाळेचे प्रमाण कमी पडते. त्यामुळे तोंडाची स्वच्छता कमी राहते. म्हातारपणात दुर्गंध येण्याचे हे एक कारण आहे. वारंवार चुळा भरून स्वच्छता ठेवणे हाच यावरचा सोपा उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊ घरगुती उपाय…
- स्वयंपाकातील कांदा व लसूण या पदार्थांमुळे तोंडाला उग्र वास येतो. पण अन्नपदार्थावर कोथिंबीर टाकल्याने हा दुर्गंध कमी होऊ शकतो. जेवणानंतर कोथिंबीरींची काही पाने चघळा त्यामुळे तोंडांचा दुर्गंध निघून जाईल. किंवा चिमूटभर मीठासोबत धणे तव्यावर रोस्ट करा व चघळा.
- वेलचीला एक गोडसर व अॅरोमिक सुगंध येतो. त्यामुळे तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा. किंवा जेवल्यानंतर वेलची घातलेला चहा घेण्यास हरकत नाही.
- स्वयंपाकामध्ये लवंग चव व सुगंधासाठी वापरण्यात येते. पुर्वीपासून दातदुखत असल्यास लवंग वापरण्यात येत असल्यामुळे आजकाल टूथपेस्ट व माऊथवॉश मध्ये देखील लवंग वापरण्यात येते. लवंगमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्यामध्ये अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असतात. तुम्ही कधीतरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता.
- संत्री लिंबू या फळांमुळे तुमच्या लाळग्रंथीला चालना मिळते व भरपूर लाळ निर्माण होते. लाळेतील अॅसिड घटकांमुळे तोंडातील मृतपेशी व अन्नघटक दूर होतात.
- दालचिनीमध्ये देखील अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असल्यामुळे त्यामुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो. यासाठी तुम्ही एखादा दालचिनीचा तुकडा चघळू शकता किंवा दालचिनीचा एक कप चहा घेऊ शकता. त्याचप्रमाणे दालचिनीचे तुकडे पाण्यात उकळून ते तुम्ही माऊथवॉश करण्यासाठी देखील वापरु शकता.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ तारखेपासून मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार
- अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची मदतीची भूमिका – जयंत पाटील
- राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण आढळले
- ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
- परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा – विजय वडेट्टीवार