हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. मात्र, यामुळे नुकसान होऊ शकते. यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा. जाणून घेऊया गरम पाणी आणि इतर सवयींमुळे होणारे नुकसान आणि त्यावरील उपायांविषयी…
– अनेकजण अंघोळ करताना फक्त हातांना, बगलेत आणि चेहऱ्याला साबण लावतात, परंतु संपूर्ण शरीरावर चांगल्या प्रकारे साबण लावला पाहिजे.
– गरम पाण्याने दहा मिनिटांपेक्षा जास्त अंघोळ करू नये.
– गरम पाण्याने स्नायू सैल होतात, असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण यामुळे त्वचा रुक्ष होते.
– सतत गरम पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कधी-कधी कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेमध्ये मॉइश्चर टिकून राहील.
– गरम पाण्याने अंघोळ केल्याने इंटर्नल हीट लॉस होते. यासोबतच थंड वातावरणात शरीर सहन करत नाही.
– सुगंधित साबणाने अंघोळ केल्याने त्वचा रुक्ष होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या –