साध्या ‘रेडी टू इट’ पदार्थांच्या पाकिटावर देण्यात आलेल्या माहितीमध्येही त्या पदार्थात असणाऱ्या फॅट्सचा वारंवार विचार केला जातो. फॅट्सचं प्रमाण वाढल्यामुळे स्थुलता वाढते असाच अनेकांचा समज असतो आणि मग याच समजापोटी सुरुवात होते ती म्हणजे कमीत कमी फॅट्सचं सेवन कसं करता येईल याचे उपाय शोधण्याची. परिणामी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल आणि पुढे येणारी आव्हानं.
डार्क चॉकलेट-चॉकलेट हे फक्त त्याच्या चवीसाठीच खाल्लं जातं असं नाही. तर, त्यात अ आणि ब जीवनसत्त्वही असतात. कॅल्शियम, लोह, पोटॅशियमचे घटकही त्यात आढळतात. कमी रक्तदाबावर उपाय म्हणूनही चॉकलेटचं सेवन केलं जातं.
असे करा चष्म्यामुळे चेहऱ्यावर पडलेले डाग दूर
अंड-आहाराच्या सवयींमध्ये आणि डाएटमध्ये अंड्यांना फार महत्त्वं दिलं जातं. प्रथिनयुक्त पदार्थ म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. अंड्यामध्ये असणारे फॅट आणि त्यातील इतर तत्व शरीरात असणाऱ्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतं, त्यासोबतच डोळ्याच्या आरोग्यासाठीही त्याचा वापर होतो.
ओटमिल- इतर पदार्थांच्या तुलनेत ओटमिलच्या माध्यमातून मिळणाऱ्या फॅटचं प्रमाण हे जास्त असतं. सहसा अनेकजण ब्रेकफास्टमध्ये ओटमिल खाण्याला प्राधान्य देतात. ज्यामध्ये उपयुक्त अशा पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. रोजच्या आहाराच्या सवयींमध्ये आणि डाएट प्लॅनमध्ये ओट्सचा वापर केल्यास त्यातून मिळणारी अमिनो अॅसिड, क्षार, लोह, प्रथिनं आणि जीवनसत्वंही शरीरास उपयुक्त ठरतात.
थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे फायदेशीर
चीझ- नुसतं नाव जरी घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. विविध पदार्थांमध्येही हल्ली चीझचा सर्रास वापर केला जातो. अशा या चीझची डाएटमध्येही महत्त्वाची भूमिका असते. स्नायूंच्या बळकटीसाठी त्यात असणाऱ्या फॅट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
सुकामेवा- सुकामेवा अनेकांनाच आवडतो. मुळात तो खाण्यासाठी कोणाचाच सहसा नकार पाहायला मिळत नाही. सुकामेवा हा ओमेगा फॅटी अॅसिड, अल्फा लिनोहोलिक अॅसिड यांनी परिपूर्ण असतो.
सर्व मागासवर्गीय महिला सहकारी संस्थांना शेळी गटाचे वाटप करणार – दत्तात्रय भरणे https://t.co/3SB9hWcOKs
— KrushiNama (@krushinama) January 23, 2020