Share

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काजू आहेत फायदेशीर, माहित करून घ्या

कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पन्न घेतले जाते. काजू आपल्या शरीरासाठी खुपचं उपयोक्त आहे. काजूत मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटँमिन, बी, सी, के, आयर्न, पोटँशिअम याचे प्रमाण जास्त असतं. त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी काजूच्या बियांचं तेल वापरायला सुरु करा.

यामुळे काजू खाल्ल्याने आपल्याला उर्जा मिळते. याच बरोबर अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. काजूच्या बियांपासून बनवलेल्या तेलाने त्वचा टवटवीत होते. ह्या तेलात सेलेनियम, झिंक, मॅग्नेशियम आणि लोहाचं प्रमाण मुबलक असतं.

काजू खाल्याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते आणि ग्रास्पिंग पावर देखील वाढते. त्यामुळे लहान मुलांना काजू आवर्जून खायला द्यावेत. काजू हे मेंदूच कार्य सुरुळीत ठेवण्यासाठी महत्वाचे आहे.

याच प्रमाणे काजू खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढते. तसेच काजूच्या सेवनाने डोकेदुखीचा त्रास कमी होतो. काजूमुळे मेंदूच कार्य अधिक चांगल होतं. त्यामुळे ब्रेन अधिक स्मार्ट करण्यासाठी काजू खाल्लेले अधिक फायदेशीर असतात. सोबतच पॉली केमिकल्स आणि अँटी-ऑक्सिडंट त्वचेला तजेला आणतात. यामुळे आपण रोज सकाळी उपाशी पोटी ३-४ काजू आणि मध खाल्ले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon