खजूर आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातून किमान चार खजूर खावेत, असे कुणी, कधीतरी आपल्याला सांगितलं आहे. पण खजूर खाण्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत आपल्याला माहिती असते असं नाही. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर खाणे चांगले असते किंवा आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणूनही दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा, असे घरातील व्यक्तींकडून सांगितलं जातं. पण आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो.
खजुरामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्व असते. ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याशिवाय खनिज, ऊर्जा मिळण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. मात्र खजुराचे असेही काही फायदे आहेत जे आपल्याला माहिती नसतात. खजुरामुळे त्वचा नितळ आणि केस मजबूत होण्यास मदत होते.
जाणून घेऊयात खजूर खाण्याचे फायदे –
- तात्काळ ताकद मिळते – खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यवर्धक मात्रा असतात. ग्लुकोज, फळातील साखर प्रमाण असते. त्यामुळे खजूर खाण्यामुळे याचा शरीराला लाभ होतो. दोन ते चार खजूर खाल्ले तर आपल्याला एनर्जी मिळते.
- केस गळण्यावरील उत्तम उपाय – केस गळणे ही समस्या पूर्वी केवळ वयस्कर लोकांमध्येच दिसून येत होती. मात्र आता सर्वच वयोगटातील लोकांना ही समस्या जाणवते. खजुरामधील घटक ही समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा.
- वजन वाढविण्यास मदत – आपले वजन वाढत नसेल. तुमची देहएष्टी किरकोळ असेल तर वजन वाढविण्यासाठी खजूर मदत करतो. व्हिटॅमिन आणि प्रोटीन (प्रथिने) जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते. बारीक असणाऱ्या व्यक्तींनी रोज ४ ते ५ खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढेल.
- त्वचा चमकते – खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.
- चेहऱ्यावरील चट्ट्यांसाठी उपाय – काहींच्या चेहऱ्यावर डाग किंवा चट्टे असतात. खजुरामध्ये असणाऱ्या ब जीवनसत्वामुळे चेहऱ्यावरील चट्टे कमी होण्यास मदत होते. खजूर खाण्याबरोबरच खजूर आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने हे डाग कमी होण्यास मदत होते.
- हाडे मजबूत होण्यास मदत – खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
- कपापासून मुक्तता – ज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री चार खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर खा. आपल्याला काही दिवसात याचा फायदा लक्षात येईल.
महत्वाच्या बातम्या –