मुळा हेक्टरी प्रामुख्याने थंड हवामानातील पीक आहे. मुळयाची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाटयाने होते. परंतु चांगला स्वाद आणि कमी तिखटपणा येण्यासाठी मुळयाच्या वाढीच्या काळात 15 ते 30 अंश से. तापमान असावे. मुळयाच्या वाढीच्या काळात तापमान जास्त झाल्यास मुळा लवकर जून होतो आणि त्याचा तिखटपणाही वाढतो.
मुळयाची जमिनीतील वाढ चांगली होण्यासाठी निवडलेली जमीन भुसभूशीत असावी. भारी जमीनीची चांगली मशागत करावी. अन्यथा मुळयाचा आकार वेडावाकडा होतो आणि त्यावर असंख्य तंतूमूळे येतात. अशा मुळयाला बाजारात मागणी नसते. मुळयांची लागवड अनेक प्रकारच्या जमिनीत करता येत असली तरी मध्यम ते खोल भूसभूशीत अथवा रेताड जमिनीत मुळा चांगला पोसतो.
चोपण जमिनीत मुळयाची लागवड करू नये. पुसा हिमानी, पुसा देशी, पुसा चेतकी, पुसा रेशमी, जपानीज व्हाईट, गणेश सिंथेटीक या मुळाच्या आशियाई किंवा उष्ण समशितोष्ण हवामानात वाढणा-या मुळाच्या जाती आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ निर्णय : दि. १२ मे २०२१
- साखर कारखान्यातून आता मिळणार ऑक्सिजन; राज्यातील ‘या’ साखर कारखान्याने केली ऑक्सिजन निर्मिती
- चांगली बातमी – देशात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात
- ६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीसाठी धोरणामध्ये बदल करू – नितीन राऊत
- राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
- जिल्ह्यातील कृषी विमा पॅटर्नमुळे आता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा