महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा जिल्हयामध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची पक्व असली तरी रंग हिरवागार असल्याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरची चवीमधील फरक हा मुख्यत्वे करून फळामधील कॅपीसीनच्या प्रमाणावर अवलंबून असते. ते साधारणतः 2 ते 4 टक्केपर्यंत असते.
हवामान
ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तपमान 25 सेल्सिअस व रात्रीचे 14 सेल्सिअस या पिकास उत्तम तापमान असून तापमान 10 सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास व ठिपके पडल्यास या पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
जमीन व हंगाम
ढोबळया मिरचीची लागवड ऑगस्ट, सप्टेबर महिन्यात करतात. त्यामुळे फळांची काढणी जानेवारी, फेब्रूवारी या कालावधीत करता येते. ढोबळी मिरचीला जमिन चांगली कसदार व सुपीक लागते. मध्यम ते भारी काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन या पिकास योग्य आहे. नदीकाठच्या पोयटयाच्या सुपिक जमिनी लागवडीस योग्य आहेत. जमिनीचा सामु 6 ते 7 च्या दरम्यान असावा.
पूर्वमशागत
ढोबळया मिरचीची लागवड रोपे लावून करतात यासाठी एक किंवा दोन आर क्षेत्रावर रोपवाटीका करावी. जमिन चांगली उभी आडवी नांगरून हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत घालावे. पूर्वीच्या पिकांचे धसकटे गोळा करून दोन कुळवाच्या पाळया द्याव्यात.
वाण
कॅलिफोर्निया वंडर – या जातीचे झाड मध्यम उंचीचे उभट वाढणारे असून मिरची गर्द हिरव्या रंगाची असते. या मिरचीचे साल जाड असून फळांना तिखटपणा नसतो. ही उशीरा तयार होणारी जात असून हेक्टरी उत्पादन 12 ते 15 टन मिळते.
अर्का मोहिनी – या जातीची फळे मोठी आणि हिरव्या गडद रंगाची असून फळाचे सरासरी वजन 80 ते 100 ग्रॅम असते. या जातीचे हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टन असते.
या जाती यलो वंडर, भारत आणि इंद्रा या सारख्या ढोबळया मिरचीच्या संकरीत जाती लागवडीस योग्य आहेत.
बियाण्याचे प्रमाण
दर हेक्टरी 3 किलो बियाणे लागतील. एक किलो बियाण्यास पेरणी करण्यापूर्वी 2 ग्रॅम थायरम चोळावे.
लागवड
रोपे तयार करण्यास निवडलली रोपवाटीकेची जागा चांगली नांगरून कुळवून तयार करावी. त्यानंतर तीन मीटर लागवडीसाठी लांब 1 मीटर रूंद व 15 सेमी उंचीचे गादी वाफे तयार करून वाफयावर चांगले कुजलेले शेणखत घालावे. वाफयांच्या रूंदीला समांतर अशा 2 सेमी खोलीच्या रेघा ओढून त्यांत फोरेट 10 जी हे किटकनाशक 10 ग्रॅम प्रत्येक वाफयात टाकून बी पेरावे व ते मातीने झाकून टाकावे व बियाण्यांची चांगली उगवण व्हावी म्हणून वाफयांना झारीने हलकेसे पाणी दयावे. बी 6 ते 8 आठवडयाने लागवडीस तयार होते.
पुर्नलागवड करण्यासाठी 60 सेमी अंतराने स-या काढाव्यात. रोपे सरीच्या दोनही बाजूस सरीच्या बगलेत 30 सेमी अंतरावर एका ठिकाणी एक रोप लावून करावे. पूर्नलागवड शक्यतो दुपारी 4.00 नंतर करावी. व रोपांना लगेच पाणी द्यावे.
खते व पाणी व्यवस्थापन
हेक्टरी 15 ते 20 टन शेणखता व्यतिरिक्त 150 किलो नत्र 150 किलो स्फूरद व 200 किलो पालाश ची आवश्यकता असते. पैकी पालाश व स्फूरद यांचा पूर्ण हप्ता व नत्राचा अर्धा हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा. उरलला नत्राचा हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने व दुसरा हप्ता 50 दिवसांनी द्यावा.
ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्या वाढीसाठी भरपूर व नियमित पाण्याची आवश्यकता असते. फूले व फळे लागताना नियमित पाणी दयावे. सर्वसाधारपणे एक आठवडयाचे अंतराने पाणी दयावे.
आंतरमशागत
ढोबळी मिरची चुरडा मुरडा या रोगास बळी पवडत असते. त्यासाठी मिरचीचा मळा नेहमी स्वच्छ असणे आवश्यक असते. त्यासाठी सुरुवातीच्या काळास जरूरीप्रमाणे दोन तीन वेळा निंदणी करावी. तसेच झाडांना मातीचा भक्कम आधार द्यावा.
रोग व किड
रोग
मरया रोगामध्ये शेंडयाखालील भाग वाळत जातो. हा रोग फायटोप्थोरा या अळिंबीच्या प्रकारामुळे होतो.
उपाय – रोगग्रस्त झाडे समुळ नष्ट करावीत व राहिलेल्या झाडांच्या मुळाजवळ 0.6 टक्के तीव्रतेने बोर्डो मिश्रण ओतावे.
बोकडया
हा व्हायरस रोग असून या विषाणूंचा प्रसार माव्याच्या किडीमार्फत रोगट झाडा पासून चांगल्या झाडाकडे होत असतो. या रोगामुळे पाने आखडून झाडांची वाढ खुंटते. झाडांना फूले येत नाहीत. व उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.
उपाय – रोगग्रस्त झाडे समुळ उपटून नष्ट करावीत. 1 किलो मोनोक्रोटोफॉस प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात घेऊन झाडांवर दर 15 दिवसांचे अंतराने नेहमी फवारणी करावी.
काढणी व उत्पादन
फळे हिरवीगार व संपूर्ण वाळलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाळलेल्या स्त्री केसरांचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते. परंतु यामुळे पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व उत्पादन कमी मिळते. फळे झाडावरून देठासहीत काढावीत. साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4 ते 5 काढणीत सर्वर पिक निघते. प्रति हेक्टरी ढोबळया मिरचीचे 17 ते 20 टनापर्यंत सरासरी उत्पादन मिळते.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- सतर्क राहा: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
- पुढेचे चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
- जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; तर ‘या’ धरणांच्या साठ्यामध्ये वाढ
- बेरोजगारांसाठी मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय