जिरे हे प्रत्येक स्वयंपाक घरात सहज मिळते. जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, झिंक इत्यादी भरपूर प्रमाणात असते. जिरे अन्नपदार्थांची चव वाढवते, शिवाय ते आरोग्यदायी आहे. त्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. जिऱ्याचे फायदे कोणते जाणून घेऊयात.
– त्वचेवर होणारे एजिंग मार्क्स कमी होण्यास मदत होते.
– त्वचेसंदर्भातील आजार बरे होतात. एक्जिमासारख्या आजारावर जिऱ्याचा लेप लावावा.
– अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
जाणून घ्या अननसचे ७ मोठे फायदे
– मधुमेहावर नियंत्रण राहते.
– अनावश्यक चरबी शरीराबाहेर पडते.
– हाताला घाम येत असल्यास जिरे पाण्यात उकळावे आणि ते पाणी थंड करून तहान लागल्यावर प्यावे.
– पचनक्रिया सुधारते. पोटाचे विकारही दूर होण्यास मदत होते.
…..म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं
– गॅस आणि वातावर उत्तम उपाय आहे. बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
– शरीरातील रक्त शुद्ध होते. रक्ताची कमतरताही भरून काढते.
– त्वचा तजेलदार होते.