मुंबई – ऊस गाळपासह साखर उत्पादनात कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. कोल्हापूरजिल्ह्यामध्ये तब्बल १४४.३५ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६२.७१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. कोल्हापूर सरासरी साखर उतारा ११.२७ टक्के इतका आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १६ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ६००.३३ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात १६ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल ५९५.३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ९.९१ टक्के इतका आहे.
महत्वाच्या बातम्या –
- पुन्हा पाऊस! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- चिंचेच्या पानांचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…
- राज्यात पुन्हा पाऊस! ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता
- कोरोनाचा कहर; राज्यात गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- शाळा ,कॉलेज सुरु होणार का? याबात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता
- देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात आढळले ‘इतके’ रुग्ण