राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटचा मोठा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस  पडला. ८,९ जानेवारीला अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात ८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडला. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कापूस, हळद, कांदा, गहू, भाजीपाला, हरभरा, संत्रा, केळी, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अकोला जिल्ह्यातही ८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, कापूस, गहू, हरभरा  या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्यामुळे तब्बल १४ हजार ८३० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्यामुळे तब्बल  ९९७ हेक्‍टररवर पिकांचे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –