गणित, मृद स्थापत्य शास्त्र, मृद रसायन शास्त्र, मृद भौतिक शास्त्र, जीव रसायन शास्त्र, हवामान शास्त्र, खनिज शास्त्र, वनस्पती शरीर शास्त्र, अर्थशास्त्र, कृषिविद्या शास्त्र, कीटक शास्त्र आणि वनस्पती जनन शास्त्र यांचा प्रामुख्याने उल्लेख करावयास पाहिजे. यशस्वी उस बागायती मध्ये अनेक विज्ञान विषयाचा सहभाग आहे.
या प्रत्येक शास्त्रातील काही आडाखे महत्वाचे आहेत की जे आपण आत्मसात केले पाहिजेत. तर आपण सहज १०० टन उत्पादन मिळवू शकतो. आपणाकडे लागवड करताना बियाणे म्हणून उसाची ३ डोळे, २ डोळे आणि १ डोळा असणारी कांडी किंवा रोप वापरले जाते. लावलेल्या कांड्यांमध्ये उसाच्या बुडक्याकडील ३-४ पेरांचे डोळे जून झाल्याने उगवत नाहीत, तसेच डोळा बघून कांडी तोडली आणि लावली जात नाही. त्यामुळे १०० टक्के उगवण होत नाही.
याच प्रमाणे पट्टा पद्धतीने लागवड केल्यास एकूण सऱ्यांपैकी ६६ टक्के (दोन-तृतीयांश) सऱ्यांमध्ये लागवड होते व ३३ टक्के (एक-तृतीयांश) सऱ्या मोकळ्या राहतात. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार सुरू उसाला एकरी १६ बैलगाड्या शेणखतासोबत साधारणतः २५० किलो युरिया, २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश असे ६०० किलो रासायनिक खत देण्याची शिफारस आहे.
फुटव्यांच्या संख्येचे नियोजन करताना सरी किती फुटांची आहे, किती डोळ्यांची कांडी बियाणे म्हणून वापरली आहे आणि दोन बियाण्यांच्या कांडीमध्ये किती अंतर ठेवले आहे यावर अवलंबून असते. याकरिता काही ठोकताळे लक्षात घेणे आवश्यक आहे.
तसेच १ गुंठा म्हणजे १०८९ चौ. फूट. त्यावरून एक एकर (४० गुंठे म्हणजे ४३,५६० चौ. फूट) जर आपण या क्षेत्रात ३ फूट अंतरावर सरी सोडल्यास १४,५२० रनिंग फूट सरी लागवडीकरिता उपलब्ध होईल. तसेच समजा सऱ्यांची एकूण लांबी १५,००० रनिंग फूट आहे, एकरी चाळीस हजार फुटव्यांची संख्या ठेवण्यासाठी नियोजन खालील तक्त्यात पाहता येईल.
महत्वाच्या बातम्या –