Share

बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी खते व पाण्याचे असे करा व्यवस्थापन, जाणून घ्या

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे.

लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्यावेळेस ६ ते ८ दिवसांच्याअंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्यापाळ्या कमी कराव्यात. करपा – पानवर काळे ठिपके पडून पाने गळतात. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात. डायथेनएम ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मर – मोठी झाडे पिवळी व मलूल दिसतात. बुंध्याजवळ जमिनीलगतच्याभागावर बुरशीची वाढ झालेली दिसते. पिकांची फरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात आणता येतो. जमिनीत नँप्थलीन किंवा फॉरमँलिन(१:५०) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.

चारकोल राँट किंवा खोक्या रोग – या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस पेक्षाअधिक असल्यास ते रोगजतूना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नसतात. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस च्या वर चढण्यापूर्वी बटाट्याचीकाढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.

देठ कुडतरणारी अळी – राखी रंगाची अळी असून रात्रीचे वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने व कोवळे देठ खातात. या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम ५ % पावडर हेक्टरी ५० किलो जमिनीवर सायंकाळी धुराळावी. मावा व तुडतुडे – या किडीत पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात.

लागवडीनंतर १५ दिवसांनी मिथिल डिमेटाँन १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून किंवा फाँस्फोमिडाँन ८५ डब्लू एमसी १० मिलि १० लिटर पाण्यात फावरावे. बटाट्यावरील पंतग – हि किड बटाट्याचे अतोनात नुकसान करते. या किडीची सुरवात शेतातूनहोते. परंतु नुकसान हे साठवणुकीच्या काळात दिसून येते. या किडीच्या आळया पानात देठात व खोडात शिरून पोखरतात. आळया बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून खातात. या किडीच्या बंदोब्स्तासाठी कार्बारील ५० डब्लू.पी. १.५ किलो ७५० पाण्यात मिसळून फावरावे.

महत्वाच्या बातम्या – 

मुख्य बातम्या पिकपाणी

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon