सफरचंदामुळे होणारा आरोग्यदायक लाभ, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबान इलाज आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोहा सारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात.

सफरचंद खाण्याचे फायदे –

  • सफरचांदाची साले रक्तातील सारखेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे ज्यांना मधुमेह असेल त्यांनी सफरचंद सालासकट खाणे गरजेचे आहे.
  • सफरचंदाच्या सालांमुळे मेंदूतील पेशी लवकर खराब होत नाहीत. तसेच यामुळे बुद्धी चलाख होण्यास मदत होते. त्यामुळे सालीसकट खाल्लेले सफरचंद फायद्याचे असते.
  • मोतीबिंदूपासून बचाव होण्यासाठी सफरचंद सालांसकट खाण्याने मदत होते. तसेच नियमितपणे सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू होत नाही.सफरचंदात जास्त प्रमाणात फायबर असल्याने पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयुक्त असते. यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीही मदत होते. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठीही सफरचंद खाणे फायदेशीर असते.
  • सफरचंद हे दातांना किडण्यापासून बचाव करते. याशिवाय गर्भवती महिलांमध्ये रक्तवाढीसाठी सफरचंद उपयुक्त ठरते. त्यामुळे सफरचंदाचा आहारातील समावेश तोही सालांसकट अतिशय महत्त्वाचा असतो.

महत्वाच्या बातम्या –