पोकरा योजना सन २०२१-२२ साठी ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित; राज्यातील ५ हजार १४२ गावांना होणार लाभ

मुंबई – नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) (Pokra) सन २०२१-२२ साठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी (शेततळी,ठिबक संच,फळबाग लागवड, इलेक्ट्रिक मोटर इ.) ,शेतकरी गटांना लाभ (शेतीसाठी सोयीसुविधा व कृषि … Read more

महा डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ – धनंजय मुंडे

मुंबई – महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी घोषित केले आहे. त्याचबरोबर 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी … Read more

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून कोविडबाधित परिवारापर्यंत लाभ पोहोचवावे – नीलम गोऱ्हे

मुंबई – कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी समन्वय साधून कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी व कोविडमुळे बाधित परिवारापर्यंत लाभ पोहचवावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिल्या. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे, नाशिक, धुळे, जालना, जळगाव, पालघर जिल्ह्यात दौरे केले होते. त्यावेळी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी … Read more

राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ?

नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान (PM-Kisan) योजनेचा दहावा हप्त्या कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीची आहे कि पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता १ जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. येत्या १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. … Read more

आता घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ, जाणून घ्या

विविध प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी आपली नेहमीच धावपळ होत असते. ही धावपळ टाळण्यासाठी  मात्र आपणास सेवा हमी कायदा 2015 व  या कायद्यामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेल्या सरकारी (Government) सेवांची माहिती असणं गरजेचं आहे.  आपले सरकार पोर्टल, आपले सरकार केंद्रे व मोबाईल ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात विविध सेवांसाठी 10 कोटी 99 लाख 81 हजार 744 अर्ज प्राप्त … Read more

पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी आता एकदाच अर्ज करा; मोबाईल ऍपद्वारे योजनांचा लाभ, प्रतिक्षा यादीचीही तरतूद

अमरावती – ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन व शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देत ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यानुसार पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवतानाच पुन्हा अर्जाची प्रक्रिया करावी लागू नये म्हणून प्रतीक्षा यादीची तरतूद केली आहे. अमरावती जिल्ह्यात अधिकाधिक शेतकरी व पशुपालक बांधवांना … Read more

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे सुनील केदार यांचे आवाहन

मुंबई – राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील … Read more

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ द्यावा – बाळासाहेब पाटील

मुंबई – औरंगाबादमधील आडगाव बुद्रुक, निपाणी व सातारा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पात्र ठरलेल्या 225 लाभार्थींना महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्ती देण्यात यावी, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. मंत्रालयात औरंगाबाद तालुक्यातील आडगाव बु., सातारा व निपाणी  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सभासदांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ … Read more

बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे दादाजी भुसे यांचे आवाहन

मुंबई – केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियान (एसएमएसपी) या योजनेतील बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी बाबतचा आढावा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. या योजनेत चांगल्या पद्धतीने सुरु असलेल्या शेतकरी बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, अन्नधान्य उत्पादक संघ आदींचा सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड … Read more

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ द्यावा – गुलाबराव पाटील

जळगाव – प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वसंबंधीत विमा कंपन्याचे प्रतिनिधी व यंत्रणांना दिलेत. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील … Read more