जमीन –
योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम, चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त नको तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी नसावी. सामु ६.१ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
हवामान –
उष्ण व कोरडे, २५ ते ३५ सेल्सिअस तापमान, ६०० मि.मी पेक्षा कमी पर्जन्यमान
लागवडीचे अंतर –
३ X १.५ मी वेलीची संख्या / हे २,२२२
लागवडीची वेळ/दिशा –
डिसेंबर – जानेवारी किंवा जून – जुलै / दक्षिणोत्तर
लागवडीची पद्धत –
अ) स्वमुळावरची लागवड ब) खुंटावरील लागवड असलेल्या ठिकाणी म.फु.कृ विद्यापीठाने डॉगरीज या खुंटाची शिफारस केली आहे. डॉगरीज या खुंटाजी लागवड डिसेंबर- जानेवारीमध्ये करुन त्यावर पाचर कलम करावे. कलम करतेवेळी योग्य जात निवडावी.
सुधारित जाती –
थॉमसन सिडलेस, तास-ए-गणेश, सोनाका, माणिक चमन, शरद सिडलेस व फ्लेम सिडलेस, रेडग्लोब
वळण देण्याची पध्दत –
टी (T) किंवा मंडप पध्दतीचा अवलंब करावा.
संजीवकाच्या मात्रा –
फुले उमलण्यापूर्वी १० ते २० पी पी एम जिब्रॅलिक अॅसिडची फवारणी करावी. २५ % टोप्या पडल्यानंतर २० पी पी एम व ७५ % टोप्या पडल्यानंतर ४० पी पी एम मध्ये घड बुडवणी करावी. फळधारण झाल्यानंतर ४० पी पी एमचा फवारा द्यावा.
खताच्या मात्रा –
डॉगरीज खुंटावर लागवड केलेल्या द्राक्ष पिकास प्रति हेक्टरी ६६६ कि. नत्र ४४४ कि. स्फुरद व ४४४ कि. पालाश द्यावे. खरड छाटणीनंतर ७० % नत्र (४६६ कि.) ५० % स्फुरद (२२२ कि.) व १७५ कि. पालाश विभागुन द्यावे. खरड छावणीनंतर उर्वरीत स्फुरद लगेच द्यावा तर नत्र १५ दिवसाना द्यावा. पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यत उर्वरीत पालाशापैकी ७० % द्यावा. तर पाणी उतरण्याच्या अवस्थेत उर्वरीत ३० % द्यावा.
द्राक्षाची छाटणी –
- अप्रिल छाटणी किंवा खरड छाटणी– द्राक्षवेलीच्या काडावरील डोळ्यामध्ये सूक्ष्मघड निर्मिती होण्यासाठी एप्रिल किंवा खरड छाटणी महत्त्वाची असते. एप्रिल छाटणीनंतर ७ पानांवर गरजेनुसार सबकेन करावी.
- ऑक्टोबर छाटणी – द्राक्षाच्या माल काडीमधुन घड बाहेर येण्यासाठी ऑक्टोबर छाटणी करणे आवश्यक असते.
वेल व्यवस्थापन – प्रतिवेलीवर काड्यांची संख्या – ३५ ते ४०
प्रतिकाडीवर पानांची संख्या – १५ ते १६
गुणवत्तेशीर द्राक्ष उत्पादनासाठी – १) विरळणी २) गर्डलिंग ३) योग्य व्यवस्थापन ४) योग्य वेळी योग्य संजीवकाचा वापर करावा.
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
- खरड छाटणी तसेच ऑक्टोबर छाटणी वेळेवर करुन छाटलेल्या काड्या व पाने बांधावर न टाकता जाळून नष्ट कराव्यात.
- छाटणीनंतर खोड व वलांड्यावरील मोकळी झालेली साल काढावी.
- छाटणीनंतर लगेच वेलीच्या खोडांना आणि वलांड्यांना ब्लायटॉक्स ०.४ टक्के किंवा गेरू ३ किलो प्रति १० लिटर अथवा १० टक्के बोर्डो पेस्ट + मेथोमील ३ ग्रॅम + क्लोरापायरीफॉस नुवान ३ मि.ली + १.५ मि.ली स्टिकर प्रति लिटर पाणी या प्रमाणात पेस्टींग करावे.
- फुलकिडींच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यू.जी. ३ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५% एस.पी. ३. मि.ली किंवा फिप्रोनील ८० % डब्ल्यू.जी. १५ मि.ली या किटकनाशकाची १५ दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.
- नवीन फुट आली असताना निंबोळी अर्क ५ टक्के दोन फवारण्या आणि मॅलिथिऑन ०.१० टक्केची फवारणी करावी.
- मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत मिलीबगचा प्रादुर्भाव वाढल्यास १५०० ऑस्ट्रेलियन बिटल ( क्रिप्टोलिमस भुंगेरे) प्रति हेक्टरी २१ दिवसाच्या अंतराने २ वेळेस सोडावेत.
- फवारणीच्या पाण्याचा पी.एच. ६.५ ते ७ असावा.
- केवड्याच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झील –मॅन्कोझेब (०.२%) किंवा सायमोक्झॅनील- मॅन्कोझेब (०.२%) किंवा फिनॅमिडन- मॅन्कोझेब (०.२५%) किंवा अझोक्जीस्ट्रॉबीन (२०० मिली/एकर) किंवा फेमॉक्झॅडोन + सायमोक्झॅनील (२०० मिली/एकर) किंवा क्रिसॉक्झीम येथील (२५० मिली/एकर) किंवा पायरॅक्लॉस्ट्र्रोबीन + मेटीरॅम (१.७५ ग्रॅम/लीटर) या बुरशीनाशकांच्या ५ फवारण्या छाटणीनंतर १२ दिवसांचे अंतराने आलटून-पालटून कराव्यात.
- भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी ८०% पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम किंवा डिनोकॅप ५ मि.ली १० लिटर पाण्यात किंवा ट्रायडेमिफॉन २५० ग्रॅम किंवा पेनकोनॅझॉल ५ मि.ली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- तसेच भुरी रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी नियोजन करावे.
फळ छाटणीनंतरचे दिवस | औषधे | प्रमाण |
४० |
फ्लुजीलॅझोल ४० ई.सी | ०.१२५ मि.ली./लिटर |
६० |
पेनकोनॅझोल १० ई.सी + पोटॅशिअम बायकार्बोनेट | ०.५ मिली + ५ ग्रॅम/लीटर |
७० |
ट्रायडेमिफॉन २५ डब्ल्यू.पी. | १ ग्रॅम/लीटर |
८० |
हेक्साकोनॅझोल ५ ई.सी + पोटॅशिअम बायकार्बोनेट | १ मि.ली + ५ ग्रॅम/लीटर |
९० |
मायक्लोब्युटॅनील १० डब्ल्यू. पी. | ०.४५ ग्रॅम/लिटर |
१०५ |
अझोक्झीस्ट्रॉबीन २३ एस.सी | ०.५ मि.ली./लीटर |
१२० |
अझोक्झीस्ट्रॉबीन २३ एस.सी | ०.५ मि.ली./लीटर |
महत्वाच्या बातम्या –
- चिंता वाढली – राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. १५ सप्टेंबर २०२१
- झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
- नुकसानीने शेतकऱ्यांनी खचून जावू नये, शासन अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे – अब्दुल सत्तार
- शेतकऱ्याकंडून जबरदस्तीनं वसूली करण्याकरता हा सगळा बाऊ केला जातोय – देवेंद्र फडणवीस
- पीक विमा योजनेतील नफेखोरी थांबवा – उद्धव ठाकरे